वसतिगृहाकरिता इमारत भाडेतत्वावर द्यावयाची असल्यास इच्छुकांनी संपर्क साधावा
रायगड,(जिमाका)दि.24:- मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, अलिबाग या वसतिगृहाचा इमारतीचा करारनामा 31 जुलै 2024 रोजी संपत असल्याने वसतिगृहाकरीता भाडेतत्वावर 4 हजार ते 5 हजार चौ. फूट जागेच्या इमारतीची आवश्यकता आहे.
या वसतिगृहाची विद्यार्थींनी मान्य क्षमता 80 असून या वसतिगृहात गरजू, होतकरू हुशार विद्यार्थींनी शिक्षणाकरीता रहिवास,अभ्यास करतात. त्यांना योग्य सोई सुविधायुक्त इमारत होण्याकरीता इच्छुकांनी वसतिगृहाकरिता इमारत भाडेतत्वावर द्यावयाची असल्यास गृहपाल, मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, अलिबाग, दिव्याअपार्टमेंट, आर.सी.एफ.गेटसमोर वेश्वी, अलिबाग येथे संपर्क साधावा.
००००००
Comments
Post a Comment