मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आवाहन

 

 

रायगड जिमाका दि.22:-  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरीता मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करण्यात आली असून मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभासाठी पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

पात्र वृध्द लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थतता/ दुर्बलतेनुसार चष्मा,श्रवणयंत्र, ट्रायपॉड स्टिक, व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इ. सहाय्यभूत आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरीता  तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ.द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत पात्र वृध्द लाभार्थ्यांना र.रु.3000/- त्याच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येतील.

 

या योजनेबाबत अधिक माहिती व योजनेचे अर्ज प्राप्त करण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण रायगड कच्छिभवन, नमिनाथ जैन मंदिरा जवळ, श्रीबाग रोड, अलिबाग, जि.रायगड या कार्यालयाशी संपर्क साधावा.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक