जिल्ह्यातील महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा --उपसभापती आ.डॉ.नीलमताई गोऱ्हे

 

 

रायगड(जिमाका) दि.25:- महिलांचे सक्षमीकरण आणि महिलांच्या सर्वांगीण विकासाचा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून शासनाकडून अनेक नाविन्य पूर्ण योजना राबविण्यात येत असून जिल्ह्यातील महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपसभापती विधानपरिषद महाराष्ट्र राज्य आ.डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी आज येथे केले.

 अलिबाग येथील होरीझोन हॉल येथे आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सन्मान यात्रा, पुष्प दुसरे कार्यक्रम सोहळा  कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी आमदार महेंद्र दळवी, आमदार भावनाताई गवळी, श्रीमती मीनाताई कांबळी, श्रीमती शीतलताई म्हात्रे, श्रीमती ज्योती ताई वाघमारे, श्रीमती कलाताई शिंदे, श्रीमती शिल्पाताई देशमुख, श्रीमती मानसी दळवी, श्रीमती संजीवनी नाईक, श्रीमती तृप्ती पाटील उपस्थित होत्या.

यावेळी श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या की, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना हा राज्य शासनाचा क्रांतिकारी निर्णय आहे. महिलांचे आरोग्य, पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. जिल्ह्यात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी सुरु जिल्ह्यातील महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा.  महिलांनी इतर कुणाकडूनही अर्ज भरुन घेऊ नयेत. केवळ शासकीय यंत्रणेकडून अथवा स्वत: ऑनलाईन अर्ज भरावेत. हे राज्य शासन महिलांना आर्थिक व सामाजिक दृष्टया सक्षम करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राज्य शासनामार्फत  महिलांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत.जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या उत्पादित मालाची विक्री करण्यासाठी अलिबाग येथे मॉल बांधण्यात आला असून त्याच्या विक्रीची व्यवस्था ठीक ठिकाणी केली आहे.  शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांसाठी सुद्धा  जिल्ह्यामध्ये इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट केले जात आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेतून तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरीता मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करण्यात आली असून मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभासाठी पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा. या योजनेंतर्गत पात्र वृध्द लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थतता/ दुर्बलतेनुसार चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड स्टिक, व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इ. सहाय्यभूत आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करण्याकरीता  तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ.द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत पात्र वृध्द लाभार्थ्यांना रक्कम रु.3000/- त्याच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येतील.

समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. 6 हजार, 8 हजार आणि 10 हजार विद्यावेतन तरुणांना देणारी योजना सुरु केली आहे.  तसेच जिल्ह्यात लेक लाडकी योजनेची अंमलबजावणी सुरु असून महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे ही त्या म्हणाल्या.

यावेळी विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक