राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सादर करावेत


 

रायगड,(जिमाका)दि.24:- सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या 100 विद्यार्थ्यांना देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह दि.26 ऑगस्ट 2024 पूर्वी आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, 3 चर्च पथ, पुणे 411001 यांच्याकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सुनील जाधव यांनी केले आहे.

या योजनेचे अटी व शती :- महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचा (नवबौध्दासहित) व महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावा, विद्यार्थ्याने पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना पदवीसाठी राज्य शासनाच्या किंवा इतर राज्याच्या केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा, पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची कमाल वयोमर्यादा 25 वर्षे व पदव्युत्तर पदवी/पदविका अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्षे इतकी राहील, उत्पन्न मर्यादा रु.6 लक्ष राहील (फॉर्म नं. 16 व तहसिलदार/नायब तहसिलदार सक्षम प्राधिकाऱ्याचे उत्पन्नप्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.

शैक्षणिक अर्हता :- महाराष्ट्र राज्य विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळ अथवा महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील अन्य परिक्षा मंडळातून इयत्ता 10 वी व 12 वी ची परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. व इयत्ता 12 वी च्या परीक्षेतील गुण विचारात घेऊन गुणानुक्रमे निवड करण्यात येईल. त्याकरीता विद्याथ्यांने इयत्ता 12 वी च्या परीक्षेत किमान 55 टक्के गुण व पदवी अभ्यासक्रमासाठी डिप्लोमाच्या परिक्षेत किमान 55 टक्के गुण मिळविणे आवश्यक राहील.

 

लाभाचे स्वरूप :- राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यास संबंधित विद्यापीठ/ शैक्षणिक संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पूर्ण शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक,शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेने आकारणी केलेले शुल्क तसेच भोजन शुल्काची, इत्यादी शुल्क मंजुरी. योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांस अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या पुस्तकांसाठी रु.5 हजार व शैक्षणिक साहित्य तसेच, इतर शैक्षणिक खर्च यासाठी एकूण रु.5 हजार अशी एकूण रु.10 हजार प्रत्येक वर्षी संबंधित विद्यार्थ्यास त्याच्या आधार संलग्न बँक खात्यावर दोन टप्प्यात अदा करण्यात येईल.

अर्ज मिळण्याचे व सादर करण्याचे ठिकाण : विहित नमुन्यातील अर्जाचा नमुना महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ (वेबसाईट) www.maharashtra.gov.in/ ताज्या घडामोडी आणि सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक