उरण तालुक्यातील पाणदिवे गावाचे सुपूत्र मनोज महादेव पाटील यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान

 

 

अलिबाग,दि.8(जिमाका):- महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील गुणवंत शिक्षकांना देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार उरण तालुक्यातील पाणदिवे गावातील सुपुत्र व सध्या सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अध्यापन करत असणारे श्री.मनोज महादेव पाटील यांना जाहीर झाला होता.

हा पुरस्कार नुकताच मुंबई येथील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पर्यटन  व महिला बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते सन्मानाने प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र ,सन्मानचिन्ह व रोख एक लाख दहा हजार रूपये पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी शिक्षक आमदार कपिल पाटील,शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देवोल आदि मान्यवर उपस्थित होते.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक