कायदेविषयक शिबिरे व फिरते लोक अदालत उद्घाटन कार्यक्रम संपन्न



 

अलिबाग,दि.10,(जिमाका):-  मा.उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांचे निर्देशानुसार न्याय आपल्या दारी या संज्ञेतर्गत दि.9 मार्च ते दि.7 एप्रिल 2023 या कालावधीत रायगड जिल्हयात  कायदेविषयक शिबिरे व फिरते लोक अदालत यांचे आयोजन करण्यात आले आहे.

             या कायदेविषयक शिबिरे व फिरते लोक अदालतींचा उद्घाटन समारंभ दि.9 मार्च 2023 रोजी रायगड जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रायगड श्रीमती.एस.एस.सावंत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून संपन्न झाला.

             यावेळी जिल्हा न्यायाधीश-1 श्री.अशोककुमार भिलारे, जिल्हा न्यायाधीश-2 श्री.अ.थट्टे, जिल्हा न्यायाधीश-3 श्री.एन.मणेर, श्रीमती एस.उगले, राष्ट्रीय प्राधिकरण विधी सचिव रायगड श्री.अमोल शिंदे, निवृत्त न्यायाधीश श्रीकांत उपाध्ये, जिल्हा सरकारी वकील भूषण साळवी, श्रीमती एस.सोनी, श्रीमती वर्षा पाटील, श्रीमती एस.मुळीक, श्रीमती जे.कोकाटे, श्रीमती अ.मोहिते आदि मान्यवर उपस्थित होते.

      कायदेविषयक शिबिर व फिरते लोक अदालत कार्यक्रमांचे नियोजन पुढीलप्रमाणे:-

            मंगळवार दि.14 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता संभे, रोहा पोलीस स्टेशन, ता.रोहा. बुधवार दि.15 मार्च 2023 रोजी दुपारी 2.30 वाजता दर्यागाव, पाली पोलीस स्टेशन, ता.सुधागड-पाली. शुक्रवार दि.17 मार्च 2023 रोजी दुपारी  11 वाजता लोणाशी माणगाव, माणगाव पोलीस स्टेशन, ता.माणगाव. सोमवार दि.20 मार्च 2023 रोजी सकाळी  11 वाजता वरंध, महाड पोलीस स्टेशन, ता.महाड. गुरुवार दि.23 मार्च 2023 रोजी सकाळी  11 वाजता दिवेआगर, श्रीवर्धन पोलीस स्टेशन, ता.श्रीवर्धन. सोमवार दि.27 मार्च 2023 रोजी सकाळी  11 वाजता वरसई, पेण पोलीस स्टेशन, ता.पेण. बुधवार दि.29 मार्च 2023 रोजी सकाळी  11 वाजता धुतूम, उरण पोलीस स्टेशन, ता.उरण.  शनिवार,दि.1 एप्रिल 2023 रोजी सकाळी  11 वाजता नेरे पनवेल, पनवेल पोलीस स्टेशन, ता.पनवेल. मंगळवार,दि.4 एप्रिल 2023 रोजी सकाळी  11 वाजता कलोते पोलीस स्टेशन, ता.खालापूर. गुरुवार,दि.6 एप्रिल 2023 रोजी सकाळी  10 वाजता कडाव, नेरळ तालुका पोलीस स्टेशन, ता.कर्जत.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक