महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शनाचे आयोजन

 

 

अलिबाग,दि.09(जिमाका):- ग्रामीण भागातील गरिबीचे निर्मूलन करण्यासाठी राज्यात ग्रामविकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. अभियानांतर्गत आतापर्यंत 5.17 लक्ष स्वयं सहाय्यता गटांची स्थापना झालेली असून त्यामाध्यमातून 60 लक्ष कुटुंबांना अभियानाशी जोडले आहेत. या अभियानांतर्गत निर्माण करण्यात आलेले स्वयं सहाय्यता गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू व उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यामाने दरवर्षी महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने सन 2022-23 या कालावधीतील महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शनाचे दि.08 ते 19 मार्च 2023 या कालावधीत सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (CIDCO Exhibition & Convention Center), वाशी, नवी मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे.

महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता गटांना त्यांच्या तयार केलेल्या वस्तू उत्पादने, साहित्य, नाविन्यपूर्ण कला व खाद्य पदार्थ सहजपणे शहरी नागरीकांपर्यंत पोहचविता येतात. त्यांना एक चांगली हक्काची शहरी बाजारपेठ अनुभवण्याची चांगली संधी या माध्यमातून मिळत असते. या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातील तसेच देशाच्या सर्व राज्यातून 511 स्वयं सहाय्यता गट व जवळपास 1 हजार महिला सहभागी होणार आहेत, असे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान परमेश्वर राऊत यांनी कळविले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक