सावित्री नदी व इतर अनुषंगिक नद्या व उपनद्यांमधील गाळ काढण्यासाठीच्या निविदा प्रक्रियेस दि.15 मार्च पर्यंत मुदतवाढ

 

 

अलिबाग,दि.08(जिमाका):- सावित्री नदी व इतर अनुषंगिक नद्या व उपनद्यांमधील गाळ काढण्यासाठी महाड व पोलादपूर तालुक्यातील एकूण 96 गटांचा ई-निविदेसह ई-लिलाव प्रक्रिया दि. 28 फेब्रुवारी 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीसाठी राबविण्यांत आली आहे. तथापि दि.08 मार्च 2023 पर्यंत सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत ई निविदा ऑनलाईन पध्दतीने स्विकारणे बंद झालेले आहे. या प्रकरणी दि.08 मार्च 2023 पर्यंत एकही निविदाधारकांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतलेला दिसून येत नाही. या निविदा प्रक्रियेस दि.09 मार्च  ते 15 मार्च 2023 या कालावधीसाठी प्रथम मुदतवाढ देण्यात येत आहे.

               या लिलावाच्या प्रक्रियेसंबंधी सर्व माहिती, गाळ गटांचा तपशिल, सोबतचे प्रपत्र- अ आणि गाळ उत्खननासंबंधी अटी व शर्ती यांची सविस्तर माहिती http://raigadco.abcprocure.com तसेच www.raigad.gov.in या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असे अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी कळविले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक