प्राणी क्लेष सोसायटीच्या व्यवस्थापन समितीवर अशासकीय सदस्य नेमणुकीसाठी इच्छूक व्यक्ती/संस्थांनी अर्ज सादर करावेत

 

 

अलिबाग,दि.08(जिमाका):- रायगड जिल्ह्याच्या प्राणी क्लेष सोसायटीच्या व्यवस्थापन समितीवर अशासकीय सदस्यांच्या नेमणूका करण्याविषयी महाराष्ट्र शासनाच्या कृषी,पदुम विभागाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. या समितीवर रायगड जिल्ह्यातील शासनमान्य गोशाळा, पांजरापोळ यांच्याकडील एक सदस्य, प्राणी कल्याणासाठी झटणाऱ्या विश्वस्त संस्थाकडून दोन सदस्य तसेच प्राण्यांबाबत मानवतावादी कार्य करणारे, प्राणी प्रेमी यांच्यातून 5 ते 6 सदस्यांची नेमणूक करावयाची आहे.

 याकरिता रायगड जिल्ह्यातील गोशाळा, पांजरापोळ, प्राण्यांविषयी कार्य करणाऱ्या विश्वस्त संस्था, प्राण्याबाबत मानवतावादी कार्य करणाऱ्या पात्र इच्छूक व्यक्ती/संस्था यांनी जवळच्या पशुवैद्यकीय संस्था, पंचायत समितीकडील पशुसंवर्धन विभाग, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त रायगड अलिबाग यांच्याकडे संपर्क करुन अर्ज प्राप्त करुन घ्यावा.अर्ज दि.15 मार्च 2023 पर्यंत जिल्हा पशुसंवर्धन उपाआयुक्त रायगड-अलिबाग कार्यालयाकडे सादर करण्यात यावा. अर्जासोबत त्यांनी केलेल्या प्राणी कल्याणविषयक कार्याबाबतचे अनुभव प्रमाणपत्र सादर करावे, असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, रायगड-अलिबाग डॉ.आर.बी.काळे यांनी कळविले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक