राष्ट्रीय विधी सेवा सप्ताहनिमित्त रॅली



अलिबाग,जि.रायगड (जिमाका) दि.10 -:   जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग व वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विधी सेवा दिन सप्ताहनिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले.  या रॅलीचे उदघाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग मु.गो.सेवलीकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले.
यावेळी दिवाणी न्यायाधीश व.स्तर तथा सचिव जिल्हा विधी प्राधिकरण एल.डी.हुली, मुख्यालयातील अन्य स्थानिक अधिकारी व जिल्हा सरकारी वकील संतोष पवार, वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण ठाकूर, सेक्रेक्टरी ॲड.के.डी.पाटील हे उपस्थित
            या रॅलीचा मारुती नाका, बालाजी मंदिर या मार्गाने जाऊन एस.टी.स्टॅंड अलिबाग यामार्गे जिल्हा न्यायालयात समारोप करण्यात आला.
या रॅलीमध्ये विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थींनी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील नर्सिंगच्या विद्यार्थींनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक