धान खरेदीः1550 रुपये प्रति क्विंटल दर : हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा इशारा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.7:- जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यासाठी पंचवीस केंद्रांना मंजूरी देण्यात आली असून सर्वसाधारण दर्जाच्या धानासाठी 1550 रुपये प्रतिक्विंटल दर शासनाने निश्चित केला आहे. या दरापेक्षा कमी दराने धान खरेदी केल्यास संबंधित व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी  डॉ. विज सूर्यवंशी यांनी दिला आहे.
रायगड जिल्ह्यात पंचवीस धान खरेदी केंद्रांना मंजूरी देण्यात  आली आहे. त्यापैकी धान या धान्यासाठी सर्वसाधारण दर्जा  रु.1550/- प्रति क्विंटल व  अ दर्जा रु.1590/- प्रति क्विं. आधारभूत किंमती निश्चित केल्या आहेत.
आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने धान खरेदी झाल्याचे निदर्शनास आल्यास शासन निर्णय मुद्दा क्रमांक 5.4 इतर ब) मध्ये नमूद केल्याप्रमाणे, शेतकऱ्यांने उत्पादीत केलेल्या उत्पादनाची महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी (नियमननियम 1963 च्या नियम 32 (ड) अन्वये कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या कार्यक्षेत्रात केंद्रशासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यांत येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.
००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक