पं.स. गण चाणजे ता. उरण पोटनिवडणूक कार्यक्रम


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 9:-  राज्य निवडणूक आयोगाच्या पोटनिवडणूक कार्यक्रमान्वये रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील उरण पंचायत समिती निर्वाचक गण -56 चाणजेच्या पोटनिवडणूकीबाबत प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. तो पुढीलप्रमाणे-
नामनिर्देशन स्विकारण्याचा कालावधी-दि. 23 ते 28 नोव्हेंबर 2017
नामनिर्देशनपत्राची छाननी व त्यावर निर्णय देणे-दि.29 नोव्हेंबर 2017
नामनिर्देशनपत्राबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे अपिल करण्याची शेवटची तारीख -दि.2 डिसेंबर 2017
जिल्हा न्यायाधीशांनी अपिलावर सुनावणी व निकाल देण्याची संभाव्य शेवटची तारीख –दि.5 डिसेंबर 2017
उमेदवारी मागे घेणे- जेथे अपिल नाही तेथे-दि.4डिसेंबर 2017-11-09 ब) जिथे अपिल आहे तेथे-दि. 7 डिसेंबर 2017
मतदानाची तारीख- दि.13 डिसेंबर 2017., मतमोजणीची तारीख- 14 डिसेंबर 2017, असे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक