कातकरी समाजाने शासकीय योजनांचा लाभ घ्यावा :-तहसिलदार अजय पाटणे


            अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.7:- आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी शासनाच्या अनेक योजना असून या योजनांचा कातकरी समाजाने लाभ घ्यावा, असे आवाहन पेणचे तहसिलदार अजय पाटणे यांनी येथे केले.   पेण तालुक्यातील धामणीवाडी येथे आयोजित कातकरी उत्थान अभियान कार्यक्रमांतर्गत आयोजित दाखले वाटप शिबीरात ते बोलत होते.
            यावेळी धामणीच्या सरपंच श्रीमती प्रियांका लंबाडे, नायब तहसिलदार धनंजय कांबळे, मंडळ अधिकारी डी.डी.निकम, आदिवासी विकास निरीक्षक निलेश पालकर, संशोधन सहायक डी.एस.दळवी, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र दुदुसकर, श्रमिक संघटनेचे दिलीप डाके, अनुलोमचे जिल्हा प्रमुख रविंद्र पाटील आदि उपस्थित होते.
            यावेळी मार्गदर्शन करताना तहसिलदार श्री.पाटणे म्हणाले की, कोकण विभागाचे आयुक्त जगदीश पाटील यांच्या संकल्पनेतून आदिवासी कातकरी समाजाच्या उन्नतीसाठी कातकरी उत्थान अभियान राबविण्यात येत आहे.  आदिवासींना वय व आधिवास, रहिवास, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड आदी दाखले देऊन  त्यांची आरोग्य तपासणी केली जाईल.  कातकरी समाज हा उपजिवीकेसाठी विविध ठिकाणी स्थलांतर करीत असतो.  त्यामुळे त्यांना शासकीय योजनांची माहिती नसते. ही माहिती त्यांना मिळावी व त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी हा कार्यक्रम राबविला जात आहे.  ज्यांचे वय 18 वर्षे पूर्ण झाले आहेत त्यांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी याशिबीरात संपर्क साधवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 
            या शिबीरात तहसिलदार श्री.पाटणे व सरंपच श्रीमती लंबाडे यांच्या हस्ते आदिवासी कातकरी समाजाच्या लाभ धारकांना विविध दाखले वितरीत करण्यात आले. या शिबीरात धामणी-नारले, अंबावाडी, आंबेघर कातकरवाडी, पालोडी,धावटे कातकरीवाडी या वाड्यांतून मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव उपस्थित होते. यावेळी आरोग्य विभागाकडून उपस्थितांची तपासणी करण्यात आली. आदिवासी विकास योजनांची माहिती प्र.आदिवासी विकास निरीक्षक निलेश पालकर तर आरोग्य विभागाची माहिती श्रीमती मंदा म्हात्रे, रविंद्र पाटील यांनी उपस्थितांना दिली. 
00000



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक