विधानसभा निवडणूक 2019 करिता जिल्हा निवडणूक यंत्रणेचे काम समाधानकारक ---कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौड



रायगड अलिबाग दि.15 :- विधानसभा निवडणूकीसाठी जिल्ह्याची निवडणूक  यंत्रणा सज्ज झाली आहे.  निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.  निवडणूकी संबंधिची पूर्वतयारी पूर्ण झाल्याने कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौड यांनी समाधान व्यक्त केले. 
जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूकीच्या तयारी संबंधिविषयी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री.दौंड बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्यश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक)वैशाली माने, स्वीप नोडल अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव व इतर नोडल अधिकारी उपस्थित होते.
       मतदान केंद्र संख्या व ठिकाणे, वाहतूक व्यवस्था, ई.व्ही.एम., व्ही.व्ही.पॅट संख्या, कर्मचारी संख्या, सुरक्षा आढावा, मतदान जनजागृती अभियान यासर्व निवडणूकीशी संबंधित बाबीचे नियोजन पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी  यांचे कौतुक श्री. दौंड यांनी केले.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले जिल्ह्यात आदर्श आचार संहितेचे काटेकोर अंमलबजावणी करण्याबरोबरच, स्थिर संनिरीक्षण पथके, भरारी पथके यांचा सक्षमपणे वापर करण्यात येत आहे. मतदानांची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप अंतर्गत व्यापक प्रमाणात मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी  विविध उपक्रम राबविले जात आहेत.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक