वोट कर रायगडकर…. घोषणांनी दुमदुमले अलिबाग


रायगड अलिबाग दि.19, : जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी रायगड जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी अनेक उपक्रम सुरु केले आहेत.  याच कार्यक्रमांतर्गत अलिबाग बीच येथून अलिबाग शहरात भव्य वॉकेथॉन रॅली काढण्यात आली.   वोट कर रायगडकर…. चला मतदान करु या….लोकशाही मजबूत करु या…आपका वोट आपकी ताकद…एकच लक्ष्य मताचा हक्क…. मतदार राजा जागा हो..लोकशाहीचा धागा हो…या घोषवाक्यांनी अलिबाग बीच व शहर दुमदुमून गेले.
जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी हिरवा झेंडा दाखवून या वॉकेथॉन रॅलीला अलिबाग बीच येथून सुरुवात झाली. आज सकाळी साडेसात वाजता अलिबाग बीच येथून सुरुवात होऊन रायगड जिल्हा परिषद,श्री समर्थ स्नॅक कॉर्नर,अलिबाग अर्बन बँक को.लि.,स्टेट बँक ऑफ इंडिया,अरुण कुमार वैद्य, जा.र.ह.कन्याशाळा, युनियन बँक, नगररचना कार्यालय, बस स्टँण्ड, रेवदंडा नाका, शेतकरी भवन,ठिकरुळ नाका, शिवाजी पुतळा,जामा मशिद,चावडी मोहल्ला,पोस्ट ऑफीस, अलिबाग बीच येथे रॅलीचा सांगता झाली.
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, स्वीप नोडल अधिकारी सुनिल जाधव, सहाय्यक निवडणूक अधिकारी सचिन शेजाळ तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आदि उपस्थित होते.
या वॉकेथॉन रॅलीमध्ये ज्येष्ठ नागरिक संघ, राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना, रिक्षा संघटना,कपडा व्यापारी संघटना, मेडिकल असोसिएशन, हातगाडी संघटना,लायन्य क्लब, रोटरी क्लब, इंडियन मेडिकल असोसिएशन, नर्सिंग फेडरेशन, जिल्हा परिषद अधिकारी,कर्मचारी संघटना, राजपत्रित अधिकारी महासंघ, नगर पालिका चतुर्थ कर्मचारी संघटना, विविध विभागाचे शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विविध शाळा,महाविद्यालयांचे  विद्यार्थी, जे.एस.एम.कॉलेज एनएसएस चे विद्यार्थी आदिंनी  वॉकेथॉन रॅलीत उस्फूर्त सहभाग घेतला.
अलिबाग बीच येथे उभारण्यात आलेल्या आकर्षक रेल्फी कॉर्नरला छायाचित्र काढण्याचा नागरिकांनी आनंद घेतला. जे.एस.एम.कॉलेजचे एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती अभियानांतर्गत पथनाट्य सादर केले. तसेच अलिबाग बीच येथे वाळूवर मतदाना यंत्राचे शिल्प काढण्यात आले होते.
०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक