190-उरण विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राच्या ठिकाणांमध्ये बदल




रायगड अलिबाग दि.19, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 करिता 190- उरण विधानसभा मतदार संघात सोमवार दि.21 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.00  ते सायं.6.00 वाजेपर्यंत सर्व मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.  या अनुषंगाने पुढील मतदान केंद्राच्या ठिकाणांमध्ये बदल करण्यात आला असून तो पुढीलप्रमाणे आहे.
तरघर-1-मु.तरघर, पो.उलवा, तरघर, मु.मोहाचापाडा पो.उलवा तलघर येथील केंद्र क्र.2 चे रा.जि.प.मराठी शाळा तरघर पश्चिमेकडील खोली क्रमांक 2  हे मतदान केंद्राचे  जुने ठिकाण होते. त्याऐवजी रा.जि.प.शाळा सिडको नवीन इमारत उलवे नोड सेक्टर क्र.25 पश्चिमेकडील खोली क्र.1 हे मतदानाचे नवीन ठिकाण आहे.
तरघर-2-वरची आळी पो.उलवा, कोंबडभुजे,आलवारीस वाडी (बाजार), पो.उलवा, कोंबडभुजे, शाळेच्या बाजूला,पो.उलवा, अंगणवाडीच्या बाजूला, पो.उलवा कोंबडभुजे, खालची आळी, पो. उलवा कोंबडभुजे, कातकरीवाडी, पो.उलवा कोंबडभुजे मारु मंदिर समोर पो.उलवा कोंबडभुजे येथील केंद्र क्र.3 चे रा.जि.प.मराठी शाळा कोंबडभुजे उत्तरेकडील खोली क्रमांक 2  हे मतदान केंद्राचे जुने ठिकाण होते. त्याऐवजी रा.जि.प.शाळा सिडको नवीन इमारत उलवे नोड सेक्टर क्र.25 पश्चिमेकडील खोली क्र.5 हे मतदानाचे नवीन ठिकाण आहे.
उलवे-1-न्यू इंग्लिश स्कूलच्या अलिकडे पो.उलवे, रा.जि.प.शाळा उलवे जवळ, मु.पो.उलवे, खारकर आळी, घरतआळी, पाटील आळी,घरत आळी, कुंभारआळी, खारकर आळी, मढवी आळी येथील केंद्र क्र.8 चे रा.जि.प.मराठी शाळा उलवे उत्तरेकडील खोली क्रमांक 1  हे मतदान केंद्राचे जुने ठिकाण होते. त्याऐवजी रा.जि.प.शाळा सिडको नवीन इमारत उलवे नोड सेक्टर क्र.25 पश्चिमेकडील खोली क्र.2 हे मतदानाचे नवीन ठिकाण आहे.
उलवे-2-वेताळ आळी मु.पो.उलवे कोळीवाडा,मढवी आळी,कोळीवाडा मु.पो.उलवे बौध्दवाडा, वेताळ आळी, मु.पो.उलवे गणेशपुरी येथील केंद्र क्र.9 चे रा.जि.प.मराठी शाळा उलवे पूर्वेकडील खोली क्रमांक 1  हे मतदान केंद्राचे जुने ठिकाण होते. त्याऐवजी रा.जि.प.शाळा सिडको नवीन इमारत उलवे नोड सेक्टर क्र.25 पश्चिमेकडील खोली क्र.3 हे मतदानाचे नवीन ठिकाण आहे.
190- उरण विधानसभा मतदार संघातील मतदारांनी वरील मतदान केंद्राच्या ठिकाणांमधील बदलाची नोंद घेऊन नवीन ठिकाणच्या मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी श्रीम.अश्विनी पाटील यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक