रायगडकर व्होट कर…. जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांचे आवाहन


रायगड अलिबाग दि.15 :- देशाच्या,राज्याच्या हितासाठी आणि विकासासाठी मतदानाचा हक्क तथा कर्तव्य बजावणे अत्यंत आवश्यक आहे.   हा संदेश जनमाणसात पोहचविण्यासाठी 19 ऑक्टोबर रोजी  जिल्ह्यात  वॉक मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली असून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी रायगडकर व्होट कर… असे आवाहन जिल्हाधिकारी  तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले.
स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ.सूर्यवंशी बोलत होते.  यावेळी स्वीप नोडल अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने आदि उपस्थित होते.
डॉ.सूर्यवंशी म्हणाले जिल्ह्यात आतापर्यंत स्वीप कार्यक्रमांतर्गत साडेतीन लाख संकल्प पत्र भरुन घेण्यात आले आहेत.   271 पथनाट्ये सादर करण्यात आली असून 490 बॅनर्स लावण्यात आले आहेत.  शाळा, महाविद्यालये, बचतगट, कामगार यांच्या मार्फत 236 मतदान जनजागृतीच्या रॅलीचे आयोजित करण्यात आले.  ज्या कंपनीच्या कामगारांचे व त्यांच्या कुटूंबियाचे मतदानाचे प्रमाण जास्तीत जास्त  असेल त्यांचा जिल्हा प्रशासनातर्फे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे. अशी स्पर्धा वरिष्ठ महाविद्यालयातही घेतली जाणार असून त्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे मतदानाचे प्रमाण जास्त असेल त्या महाविद्यालयातील प्राचार्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.  बचत गटांच्या ग्रामसेवा संघातही ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.  सर्व महाविद्यालयातील एन.एस.एस. चे सर्व विद्यार्थी मतदान जनजागृती मोहिमेत सहभागी झाले आहेत. 
अलिबाग येथील शासकीय रुग्णालयातील स्थानिक 42 रुग्णांसाठी विशेष मोहिमेअंतर्गत मतदानाची सोय करण्यात आली आहे.    राज्यातील हा पहिला उपक्रम आहे.  सेल्फी पाँईट, सोशल मिडिया आदिमार्फतही मतदान जनजागृती करण्यात येत आहे.  आतापर्यंत जिल्ह्यात 59  हजार  लोकांनी अभिरुप मतदान केले आहे.  
दिव्यांग मतदारांसाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. दिव्यांग (मूकबधीर) मतदारांसाठी सांकेतिक भाषेतील विशेष संदेशही सोशल मिडियावर पाठविण्यात आला आहे.
जिल्ह्यात आज अखेर 22 लाख 73 हजार 239 मतदारांची नोंद झाली आहे. त्यामध्ये 11 लाख 57 हजार 457 पुरुष मतदार, 11 लाख 15 हजार 777 महिला मतदार व इतर 5 चा समावेश आहे.   जिल्ह्यात 16 हजार 901 दिव्यांग मतदार आहेत.  मतदानासाठी 2 हजार 714 मतदान केंद्राची सोय करण्यात आली आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक