जिल्ह्यात मनाई आदेश




रायगड अलिबाग दि.19, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 करिता जिल्ह्यात सोमवार दि.21 ऑक्टोबर रोजी सकाळी  7.00 ते सायं.  6.00 यावेळेत मतदान होणार असून गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान मोजणी होणार आहे.   त्या अनुषंगाने  निवडणूकीचे मतदान व मतमोजणी कार्यक्रम शांततेत  व सुरळीत पडावे आणि कोणताही उपद्रव किंवा अडथळा न होता मतदारांना आपला अधिकार बजाविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळावे व आपला मतदानाचा हक्क निर्भयतेने बजावता यावा यासाठी सर्व शस्त्र परवाना धारकांना शस्त्र बाळगण्यास व बरोबर घेऊन फिरण्यास, मतदान केंद्राच्या 100 मी. परिसरात मोबाईल, पेजर अथवा कोणतेही संदेशवाहक यंत्र बाळगणे तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बिघडेल असे कोणतेही कृत्य करण्यास  अथवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973  चे कलम 144 नुसार मनाई आदेश जारी केला आहे.
हा मनाई आदेश जिल्ह्याच्या हद्दीतील 189-कर्जत, 190-उरण (जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या कार्यक्षेत्रापुरती), 191-पेण, 192-अलिबाग,193-श्रीवर्धन, 194-महाड विधानसभा मतदार संघाच्या हद्दीत दि.19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.00 पासून ते दि.22 ऑक्टोबर रोजी सांय.6.00 पर्यंत अमंलात राहील असे जिल्हा दंडाधिकारी प्रसिध्दीपत्रकाद्वारे  कळविले आहे.
सदरील आदेश घरोघरी जाऊन निवडणूकीसबंधी दौरा (Visit) करणे, लग्न सोहळा, अत्यंयात्रा, धार्मिक विधी,सामाजिक सण, व रुढी परंपरेने होणारे विधी इत्यादींना लागू होणार नाही.
००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक