जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिम विशेष मोहिम सुरु
रायगड(जिमाका)दि.01:- इ. 11 वी व 12 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या तसेच अभियांत्रिकी पदविका शिक्षण घेत असलेल्या व पुढील उच्च शिक्षणाकरिता व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र मिळावे याकरिता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि.04 जुलै 2025 पर्यंत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिम विशेष मोहिम सुरु असल्याची माहिती उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जयंत चाचरकर यांनी दिली आहे.
जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यापासून वंचित राहू नये यास्तव ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केलेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी ज्या जिल्ह्यातून जात प्रमाणपत्र मिळवले आहे त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्वरीत अर्ज सादर करावेत. ज्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी दि.31 मे 2025 पूर्वी अर्ज सादर केले आहेत परंतु, अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही अशा विद्यार्थ्यांनी समिती कार्यालयात दि.04 जुलै 2025 पर्यंत हजर राहून त्रुटींची पूर्तता करावी.
कार्यालयाचा पत्ता -जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, रायगड स.नं. 76/2 ब, प्लॉट नं.9, 1402 अ, तळमजला, सेंट मेरीज कॉन्व्हेंट स्कूल मागे, चेंढरे, अलिबाग. वेळ - स. 10.00 ते सायं. 06.00.
000000
Comments
Post a Comment