ग्रामीण जनतेसाठी रायगड डाक विभागाची 9 ते 11 जानेवारीला मोहीम



अलिबाग, जि. रायगड, दि.07 (जिमाका)- भारतीय डाक विभागाच्या सोबतीने निघालेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेची घोडदोड आता ग्रामीण भागात करण्याकरता विविध स्वरूपाचे कार्यक्रमचा एक भाग म्हणून ग्रामीण शहरी विभागात खास मोहीम आयोजित केली जात आहे. रायगड डाक विभागाने याबाबत पुढाकार घेताना लोकांच्या दारा पर्यन्त जाऊन आपली सेवा देताना इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक चे खाते उघडण्यासाठी मर्यादित ठिकाणी एक विशेष मोहीम आयोजित केली होती गेल्या महिन्यात त्याला मिळालेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद बघून चालू वर्षाच्या सुरवातीलाच जानेवारी मध्ये पुन्हा एकदा अशाच विशेष मोहिमेचे आयोजन केले जाणार आहे.
वैशिष्टपूर्ण असणारी ही मोहीम म्हणजे आता रायगड विभागात सर्वांनाच सामावून  घेणारी ठरणार आहे. रायगड विभागात असणाऱ्या सर्व पोस्ट ऑफिस मधून 9 ते 11 जानेवारीला दरम्यान अशी विशेष मोहिम राबऊन रायगड विभागातील प्रत्येक पोस्ट ऑफिस यात सहभागी होणार आहे. 1 मुख्य-डाकघर, 44 उप-डाकघरे 286 शाखा- डाकघरे या मधून जास्तीत जास्त ग्रामीण जनतेपर्यंत पोहचून या माध्यमातूनच ग्रामीण विभागाला मोबाईल बँकिगच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वकष प्रयत्न केले जाणार आहेत. या विशेष मोहिमे मधून इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक चे खाते उघडण्या सोबतच ग्रामीण जनतेची जन-जागृती सुद्धा केली जाणार आहे. ज्या मधून सामान्य ग्रामीण जनतेला मोबाईल बँकिग विषयी वाटणाऱ्या भीतीचे निराकरण करण्या बरोबरच हे व्यवहार किती सोप्या पद्धतीने करता येतात याची जाणीव करून दिली जाणार आहे. फक्त आधारबेस असणारे हे खाते म्हणजे आपली बॅंक आपल्याच घरात असल्या प्रमाणेच असणार आहे. हे खाते उघडण्यासाठी आधार नंबर शिवाय इतर कोणत्याही गोष्टीची ग्राहकाला गरज नाही. कागद विरीहीत व्यवहार हे या खात्याचे वैशिष्ट आहेच. त्या सोबतच व्यवहार करण्यासाठी आपल्या जवळचा पोस्टमनही ग्राहकासाठी उपलब्ध असणार आहे.
(A.E.P.S) या आधार इनेबल पेमेंट सिस्टीम मुळे सामान्य जनतेला आता आपल्या कोणत्याही बॅंक खात्याचे पैसे ए.टी.एम. नसतानाही पोस्ट खात्याच्या या इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेमधून मिळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या मुळे डोंगर दरी मध्ये राहणाऱ्या जनतेला आता कोणत्याही बॅंक शाखेची गरज लागणार नाही कारण जगात सर्वात मोठ नेटवर्क असणारा डाक विभागाने ही आधार इनेबल पेमेंट सिस्टीम सुविधा प्रत्येक पोस्ट ऑफिस मधून सुरु केली आहे. 30 दिवसात खात्यात रु.100 भरणा करण्याची मुभा ग्राहकाला देण्यात येऊन शून्य बँलंसने खाते उघडण्याची संधी इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेमधून दिली जाते. हे ग्रामीण भागासाठी नक्कीच सोयीच आहे.
नवीन आधार नोंदणी आधार आद्यवतनाची सुविधा  रायगड डाक विभागाने 1 मुख्य-डाकघर, 27 उप-डाकघरातून जनतेला उपलब्ध करून दिली आहेच. त्याबरोबरच ज्या भागात नेटवर्क सुविधे बाबत अडचणी येतात अशाठिकाणी विशेष मोहीम राबऊन तेथील जनतेचे आधार नोंदणी आधार आद्यवतन करण्याचे काम पार पाडले आहे. रायगड डाक अधीक्षकांनी याबाबत विशेष आहवान करताना सामाजिक संस्था, समाजसेवक, सरकारी कार्यालय यांनी मागणी केल्यास त्या ठिकाणी असणारा अपेक्षित प्रतिसादानरूप ही सुविधा विशेष मोहीम आयोजित करून  पुरवण्यात येईल. नवीन आधार नोंदणी-आधार आद्यवतनसेवा इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक या सुविधा ग्रामीण भागात जनतेच्या सोयीसाठी हे आव्हान मागणी तसा पुरवठा या प्रमाणे करण्याची तयारी रायगड डाक विभागाने केलेली आहे,  असे  व्यवसाय प्रतिनिधी रायगड विभाग मिलिंद अनंत पाटील यांनी कळविले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक