वाहन कर, पर्यावरण कर थकलेल्या आणि स्क्रॅप वाहनांचा लिलाव



अलिबाग (जिमाका)दि.7:- सदर जाहीर नोटीस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये नोंदणी प्राधिकाऱ्यांना असलेल्या अधिकारात जारी करण्यात येत आहे.  सदर नोटिशीद्वारे वाहन मालकाना, ताबेदारांना वित्तदात्यांना जाहिररित्या कर व दंड भरुन वाहने सोडवून नेण्यासाठी अवगत केले आहे.  वायुवेग पथकांनी वेळोवळी अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या वाहन मालकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोचदेय डाकेने नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. मोटार वाहन कायदा 1988 मधील तरतूदीनुसार वाहन मालकांनी पत्त्यातील बदल नोंदणी प्राधिकाऱ्यास कळविणे बंधनकारक असताना देखील सदर वाहनांच्या मालकानी या कार्यालयास तसे कळविले नाही. त्यासाठी ही जाहीर नोटीस जारी करण्यात येत आहे.
वाहनाच्या मालकांनी, ताबेदाराना, वित्तदात्यांनी लिलावाच्या दिनांकापर्यंत कार्यालयात थकीत कर व दंडाच्या रक्कमेचा भरणा करुन वाहने सोडवून घ्यावीत किंवा लिलावास हरकत घ्यावयाची असल्यास दि.18/01/2020 पर्यंत लेखी हरकत घ्यावी. अन्यथा त्यांच्या वाहनांचा लिलाव दि.22/01/2020 रोजी दुपारी 3.00 ते 5.00 या वेळेत करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तद्नंतर वाहन मालकाची कोणतीही तक्रार दावा याची दखल घेतली जाणार नाही. सदर वाहने सोडवून नेण्याची ही अंतिम संधी असेल.
थकीत करासाठीचे वाहन क्रमांक MH-06-A-7114, MH-06-2420, MH-06-D-1294, MH-06-T-0541, MH-06-D-5581, MH-06-D-5733, MH-06-D-6362, MH-06-F-5825, MH-06-M-8537, MH-06-D-5096, MH-12-AH-1439, MH-06-D-0537, MH-06-AL-3056, MH-06-D-5466, MH-06-J-4373, MH-06-W-9823, MH-06-AM-3328, MH-06-0199, MH-06-S-1489, MH-06-D-5511, MH-06-F-6597
जाहिर लिलावात सहभागी होण्यासाठी दि.17/01/2020 व 18/01/2020 सकाळी 11.00 ते संध्याकाळी 4.00 वाजेपर्यंत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळता) रु.25000/- रक्कमेचा DY.RTO PEN या नावे अनामत रक्कमेचा सीटीएस मानांकाप्रमाणे डिमांड ड्राफ्ट नाव नोंदणी करुन या कार्यालयात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे जमा करणे गरजेचे आहे. सदरची वाहने जशी आहे तशी या तत्त्वावर जाहीर लिलावाद्वारे विकली जातील.
जाहिर लिलावाचे स्थळ :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय यांचे तपासणी पथ (Test Track) जिते ता.पेण, जि.रायगड दि.22/01/2020 वेळी दु. 3.00 ते 5.00 वाजेपर्यंत. जाहिर लिलाव करावयाच्या वाहनांचे ठिकाण लिलावाच्या अटी व शर्ती या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर दि.17/01/2020 पासून प्रदर्शित करण्यात येईल. कोणतेही कारण न देता जाहिर लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकुब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण जि.रायगड यांनी स्वत:कडे राखून ठेवले आहेत.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड