साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरिता दि.25 जुलै पर्यंत अर्ज सादर करावेत

 

रायगड जिमाका दि.19:- सन-2023-24 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, अभियांत्रिकी व वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांतर्गत 60 टक्के गुण प्राप्त केलेल्या मातंग समाजातील मांग, मातंग, मिनीमादींग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरिता दि.25 जुलै 2024 पर्यंत जिल्हा व्यवस्थापक, रायगड यांचे कार्यालय, श्रीरामसमर्थ गृहनिर्माण संस्था, मर्यादित, सदनिका क्र.2 तळमजला, मारुती मंदिराच्या मागे, चेंढरे, अलिबाग येथे सकाळी 11.00 ते सांयकाळी 5.00 या वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक वंदना राणे यांनी केले आहे.

ज्येष्ठता व गुणक्रमांकानुसार जिल्ह्यातील प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यांस निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate), मार्कशिटस, 2 छायाचित्र व पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इत्यादी सह दोन प्रतीत अर्ज सादर करावा. अर्जामध्ये स्वत:चा पूर्णपत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करावा.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड