पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचाही होणार शुभारंभ

 

रायगड(जिमाका)दि.15 :- राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री उदय सामंत हे मंगळवार, 16 जुलै 2024 रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11.00 वा. जिल्हा नियोजन समिती सभागृह, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक तर दुपारी 1.00 वा. रायगड जिल्हा डोंगरी विभाग विकास समिती बैठक होणार आहे.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ कार्यक्रम पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत मंगळवार दि.16 जुलै रोजी दु.2  वाजता आर.सी.एफ.हॉल कुरुळ, अलिबाग येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना प्रतिनिधिक स्वरूपात लाभ प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषद सेस निधीतून विविध घटकांना ई शॉप वाहन वितरण करण्यात येणार आहे.

सोमवार, दि.15 जुलै 2024 रोजी सायंकाळी 6 वा.पालकमंत्री उदय सामंत हे खेड येथून मोटारीने अलिबागला पोहोचणार असून शासकीय विश्रामगृह, अलिबाग येथे मुक्कामी राहाणार आहेत.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड