जिल्ह्यातील सर्व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग घटकाचे उद्योजक, शेतकरी,नवउद्योजकांरिता कार्यशाळेचे आयोजन

  


 

रायगड(जिमाका)दि.15:-उद्योगाच्या विकासाकरीता राज्य तसेच केंद्र शासनाचे विविध विभाग त्यांचे उपक्रम व योजना उद्योग संचालनालयामार्फत राज्यात राबवण्यात येत आहेत. सर्व योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सर्व विभागांच्या सहकार्याने  दि.18 जुलै रोजी  जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे सकाळी 9.30 वा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेचे  उद्घाटन  राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रायगड उदय सामंत यांच्या शुभहस्ते व  जिल्हाधिकारी किशन जावळे,  मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ.भरत बास्टेवाड,  जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, उद्योग सह संचालक, कोकण विभाग, ठाणे श्रीमती विजु सिरसाठ, महाव्यवस्थापक जी.एस. हरळया यांच्या उपस्थितीत राहणार आहेत. 

इग्नाईट महाराष्ट्र या कार्यशाळेत डी.जी.एफ.टी. (DGFT), मैत्री (MAITRI), अॅपेडा (APEDA), न्यू इंडिया इशुरन्स (New India Insurance), इंडियन पोस्ट (Indian Post), फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन (FIEO) इ. संज्ञाद्वारे मार्गदर्शनाचे सादरीकरण होणार आहे.

 या कार्यशाळेकरीता जिल्ह्यातील सर्व सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग घटकाचे उद्योजक, शेतकरी, नवउद्योजक यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे, महाव्यवस्थापक श्री हरळय्या यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड