खालापूर नगर पंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम जाहिर

 

 

रायगड(जिमाका)दि.15:-महाराष्ट्र नगरपालिका नियम 1966 यातील नियम 4 व 5 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकान्वये जिल्हाधिकारी रायगड किशन जावळे यांनी जिल्हयातील खालापूर नगरपंचायतीच्या पोटनिवडणूकांसंदर्भात निवडणूक कार्यक्रम जारी केला आहे.

नगरपंचायतीचे नाव-खालापूर,  प्रभाग क्र.01, आरक्षण अनुसूचित जाती.

निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय अधिकारी कर्जत, उपविभाग कर्जत, ता. कर्जत, जि. रायगड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, मुख्याधिकारी, खालापूर नगरपंचायत, ता.खालापूर, जि. रायगड.

नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चीत केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरीता उपलब्ध असण्याचा कालावधी-दि.18 जुलै 2024 (गुरुवार) सकाळी 11.00 ते दि.24 जुलै 2024 (बुधवार) दुपारी 2.00 पर्यंत.

 वरील नार्मानर्देशनपत्रे स्विकारण्याचा कालावधी- दि.18 जुलै 2024 (गुरुवार) ते दि.24 जुलै 2024 (बुधवार) (सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 पर्यंत.  दि.20 जुलै 2024 (शनिवार), दि.21 जुलै 2024 (रविवार) या सुट्टींच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार नाहीत.

नामनिर्देशन पत्र स्विकारण्याचे, नामनिर्देशन पत्राची छाननी करणे व मागे घेण्याचे ठिकाण- नगरपंचायत खालापूर कार्यालय, ता. खालापूर, जि.रायगड.

नामनिर्देशन पत्राच्या छाननी व वैधरित्या नामनिर्देशित इ.झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि. 25 जुलै 2024 (गुरुवार) सकाळी 11.00  वाजल्यापासून.

नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक अपील नसेल तेथे दि.31 जुलै 2024 (गुरूवार) दुपारी 3.00 वाजेपर्यंत.

अपील असल्यास- वैधरित्या नमानिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत जिल्हा न्यायाधिशाकडे अपिल करता येईल, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करुन घेण्यासाठी प्रयत्न करावेत, अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यांत येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किवा तत्पूर्वी मात्र दि. 02 ऑगस्ट 2024 (शुक्रवार) पर्यंत.

निवडणूक चिन्ह नेमुन देण्याचा तसेच अंतिर्मारत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी.

आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक- दि. 11 ऑगस्ट 2024  (रविवार) सकाळी 7.30 पासून ते सायंकाळी 5.30 पर्यंत.

मतमोजणी व निकाल जाहिर करण्याचा दिनांक- दि. 12 ऑगस्ट 2024  (सोमवार) सकाळी 10.00  वाजल्यापासून.

 मतमोजणीचे ठिकाण- नेताजी पालकर सभागृह, तहसिल कार्यालय खालापूर, ता. खालापूर, जि. रायगड

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड