मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी जास्तीत जास्त पात्र महिलांनी अर्ज करावेत --महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे


 

रायगड जिमाका दि.18:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ जुलै महिन्यात केला आहे. या योजनेपासून एकही पात्र लाभार्थी महिला वंचित राहणार नाही, यासाठी जास्तीत जास्त पात्र महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कॅम्पच्या उद्घाटन प्रसंगी  दरबार हॉल ,पंचायत समिती मुरुड येथे  केले.

यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य मनोज भगत, माजी सभापती श्रीमती ठाकूर,महिला व बालविकास अधिकारी (जि. प.) श्रीमती निर्मला कुचिक, तहसीलदार रोहन शिंदे,गटविकास अधिकारी राजेंद्र कुमार खटाल आदि मान्यवर उपस्थित होते.

 यावेळी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या, की राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून आतापर्यंत राज्यात 40 लाख अर्ज प्राप्त झाले असून रायगड जिल्ह्यात 2 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेत 2.5 लक्ष  पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व महिला अर्ज करू शकणार आहेत. अर्ज भरणाऱ्या  अंगणवाडीसेविका,आशा वर्कर सेविका याना प्रत्येकी अर्ज  50  रुपयाचे अतिरिक्त मानधन मिळणार आहे.

यावेळी कु.तटकरे यांच्याहस्ते बचत गटांना दळण मशिन, मसाला चक्की व स्तनदा मातांना बेबी सिटचे वाटप करण्यात आले व पंचायत समिती आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाची प्रस्तावना निर्मला कुचिक यांनी केली. कार्यक्रमास अंगणवाडी सेविका,आशा सेविका,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड