दि.22 ते दि.28 जुलै या कालावधीत शिक्षण सप्ताहाचे आयोजन

 

रायगड जिमाका दि.19:- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दि.22 ते दि.28 जुलै 2024 या कालावधीत शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांनी दिली आहे.

 शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून ज्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे. रायगड जिल्ह्यामधील शाळांमध्ये उपक्रम राबविण्यात येणार आहे.

 शिक्षण सप्ताहामध्ये पुढीलप्रमाणे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सोमवार, दि.22 जुलै 2024 रोजी, अध्ययन अध्यापन साहित्य दिवस.  मंगळवार, दि.23 जुलै 2024 रोजी, मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस. बुधवार, दि.24 जुलै 2024 क्रीडा दिवस, गुरुवार, दि. 25 जुलै 2024 रोजी सांस्कृति दिवस,  शुक्रवार, दि. 26 जुलै 2024 रोजी कौशल्य व डिजीटल उपक्रम दिवस,  शनिवार, दि.27 जुलै 2024, रोजी मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात इको क्लब,शालेय पोषण दिवस, रविवार, दि. 28 जुलै 2024, रोजी समुदाय सहभाग दिवस.

याप्रमाणे शिक्षण सप्ताह अंगणवाडी केंद्रामध्ये देखील राबविण्याबाबत सूचित केले आहे.  जिल्ह्यामध्ये शिक्षण सप्ताहाची सर्व व्यवस्थापनांच्या सर्व मंडळाच्या शाळांनी यशस्वीरित्या अंमलबजावणी करावी, असे आवाहनही शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड