राष्ट्रीय लोक अदालत 1254 प्रलंबित प्रकरणात 13 कोटी 43 लाख रुपयांची वसुली 15 हजार 674 दाखलपूर्व प्रकरणात 41 कोटी रुपयांची वसुली



     अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.16- राष्ट्रीय लोक अदालत शनिवारी (दिनांक 14) पार पडली. यात संपूर्ण जिल्ह्यात 1254 प्रकरणात 13 कोटी 43 लाख 72 हजार 939 रुपयांची वसुली झाली. तसेच दाखलपूर्व 15 हजार 674 प्रकरणात 41 कोटी 25 लाख 7 हजार 572 रुपयांची वसुली झाली अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जयदीप मोहिते यांनी दिली आहे. 
            यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, रायगड जिल्ह्यात लोक अदालतीचे आयोजन शनिवारी करण्यात आले. जिल्हाभरात या लोकअदालतीचे कामकाज पाहण्यासाठी तेवीस कक्षांचे आयोजन करण्यात आले होते.  या लोक अदालतीत राष्ट्रीयकृत बँका, टेलिफोन कंपन्या, महावितरण कंपनी , विमा कंपन्या, भूसंपादन अधिकारी आदि सहभागी झाले होते.  यात भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, दिवाणी प्रकरणे , कलम 138 एन.आय.ॲक्ट विवाह प्रकरणे, तडतोड पात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी व फौजदारी अपीले, सहकार, कामगार, न्यायालयातील प्रकरणे, बँका, दूरसंचार कंपनी, ग्रामपंचायती यांची वाद पूर्व प्रकरणे तडजोडीसाठी  ठेवण्यात आले होते.  यात एकूण 1254 प्रकरणांपैकी न्यायालयात प्रलंबित भूसंपादनाच्या 42 प्रकरणात 82 लाख रुपयांची तडजोड झाली.  मोटार अपघात दाव्यांच्या 53 प्रकरणात 27 कोटी 11 लाख 6 हजार 626 रुपयांची नुकसान भरपाई तर अन्य 1159 प्रकरणात तडजोड होऊन 2 कोटी 52 लाख 56 हजार 313 एवढी रक्क्म मान्य करण्यात आली.  तर 15 हजार 674 दाखलपूर्व प्रकरणात तडजोड होऊन 41 कोटी 25 लाख 7 हजार 572 रुपयांची वसुली झाली. 
            या लोक अदालतीसाठी सर्व न्यायिक अधिकारी, जिल्हा विधिज्ञ आदि मंडळ व न्यायालयीन कर्मचारी यांनी सहकार्य केले.  अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जयदीप मोहिते यांनी दिली.
00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक