गायी-म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम 21 ऑगस्टपर्यंत नोंदणी करण्याचे पशुपालकांना आवाहन



अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.20- जिल्ह्यातील गायी-म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत सर्व समावेशक अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील पशुपालकांनी सहभागी होण्यासाठी 21 ऑगस्टपर्यंत नाव नोंदणी करावी असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.
पशुसंवर्धन विभागा मार्फत सन 2018-19 मध्ये राज्यातील गायी/म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्व समावेशक अनुवंशीक सुधारणा कार्यक्रम राबविला जात आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग होण्यासाठी जिल्ह्यातील पशुपालकांकडून नाव नोंदणी अर्ज मागविण्यात आले आहेत. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या पशुपालकांच्या अतिउत्कृष्ट गायी/म्हशींना उत्कृष्ट वळूचे रेत मात्रा वापरुन गर्भधारणा झाल्यानंतर पशुधन विकास मंडळ अकोला मार्फत क्षार मिश्रण जंत नाशके वाटप केले जाणार आहेत व जन्मलेल्या कालवडीस पहिल्या सहा महिन्यामध्ये कालवडी वजन 110 ते 120 किलो झाल्यानंतर पाच हजार रुपये प्रति कालवड या प्रमाणे  मालकास प्रोत्साहन मानधन दिले जाते. नर वासरास उत्कृष्ट वजन व अनुवंशीक माता पित्यांचे गुणधर्म प्राप्त झाल्यास सदर वळूची खरेदी ही पशुधन विकास मंडळ अकोला मार्फत केली जाते.
            या कार्यक्रमांतर्गत दुग्ध स्पर्धा आयोजित करुन शेतकऱ्यांना प्रोत्साहित केल जाते. यासाठी  विहित नमुन्यातील प्रस्ताव  21 ऑगस्ट, पर्यंत सादर करुन नोंदणी करावी. ही नोदंणी  ऑनलाईन पध्दतीने केली जाणार आहे. या संदर्भातील  मासिक नोंदी सुध्दा ऑनलाईन पध्दतीने केल्या जाणार आहेत. तरी  इच्छुक होतकरु पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिकारी, पशुधन पशुसंवर्धन व पशुधन विकास अधिकारी, पशुधन‍ विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तालपसचि, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन जिपसचि, व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग, जिल्हा पशुसंर्धन उपायुक्त रायगड अलिबाग यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त रायगड  यांनी केले आहे. संपर्क क्रमांक :- 1) जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त रायगड 02141-228036, 2) जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद रायगड 02141-222048.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक