भात पिकासाठी विमा; 24 पर्यंत मुदत शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन



            अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.20- बदलते हवामान व येणाऱ्या नैसर्गीक आपत्तीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने, पंतप्रधान पीक विमा योजना सुरु केली आहे. तरी बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी भात पिकाचा विमा, मंगळवार दि. 24 पुर्वी काढावा. यात भात पिकासाठी 70 टक्के जोखीम स्तर असुन प्रती हेक्टरी संरक्षित रक्कम 42 हजार 100 रुपये आहे. याकरीता 0.50 टक्के विमा हप्ता दर असुन शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 210 रुपये 50 पैसे रक्कम भरावयाची आहे. तरी शेतकऱ्यांनी भात पिकाचा विमा काढावा व आर्थीक नुकसान टाळावे, असे आवाहन खोपोली येथील उपविभागीय कृषि अधिकारी डी. बी. पाटील यांनी केले आहे.
जोखमीच्या बाबी  पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गीक आग, वीज कोसळणे, गारपीट,  चक्रीवादळ, पूर,  भु्खलन,  दुष्काळ, पावसातील खंड व कीड रोग इत्यादी बाबींमुळे पिकांच्या उत्पन्नात येणारी घट. हवामान घटकांच्या प्रतीकूल परीस्थीतीमुळे पिकांची पेरणी व लावणी न होणे व त्यामुळे होणारे नुकसान काढणीपश्चात तसेच नैसर्गीक आपत्तीमुळे होणारे नुकसान, या बाबी करीता रायगड जिल्ह्यासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स कं. लि. या कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी पिकाचा विमा, उतरवलेल्या शेतकऱ्यांनी स्थानिक आपत्ती अंतर्गत व काढणी पश्चात या बाबी अंतर्गत नुकसान झाल्याची घटना घडल्यापासुन, 48 तासांच्या आत या बाबतची सुचना विमा कंपनी, संबधीत बॅंक, कृषि किंवा महसुल विभाग यांना किंवा कंपनीच्या दुरध्वनी क्र. 020-41320084 टोल फ्री. क्र. 1800 118485 यांचे द्वारे देण्यात यावी.  इमेल आय डी : 160012@orientalinsurance.co.in शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या  कागदपत्रासह (7/12, व पिकाची नोंद असलेला व विमा हप्ता भरल्याचा पुरावा इ.) विमा कंपनीस सादर करणे आवश्यक आहे. शेतकरी परीपुर्ण माहितीसह  विहित नमुन्यातील अर्ज सादर करू न शकल्यास उपलब्ध माहितीच्या आधारे अर्ज  सादर करू शकतो, परंतु अर्जातील उर्वरीत माहिती 7 दिवसांच्या आत विमा कंपनीस सादर करणे आवश्यक राहील.
                      पिकाचा विमा उतरविण्याकरीता  बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकेत स्वत:च्या नावे खाते आवश्यक आहे. शेतक-यांनी विमा प्रस्तावामध्ये आपल्या जमिनीचा सर्व्हे नं. नमूद करावा. पिकाचा विमा उतरविताना एकाच विमा कंपनीचा विमा एकच वेळा उतरवावा. आपले सरकार सेवा केंद्रात ऑन लाईन पध्दतीने भरावेत. विमा अर्जा करीता आवश्यक कागदपत्रे जसे की, 7/12 उतारा  तसेच शेतात अधिसुचित पिकाची पेरणी केलेले स्वयंघोषना पत्र विमा प्रस्तावासोबत सोबत देणे आवश्यक आहे. आधार कार्ड, बँक खात्याचे तपशिल इत्यादी अर्ज ऑन लाईन पध्दतीने शेतक-ऱ्यांना विमा अजाची प्रत, तसेच अर्जाची पोहोच उपलब्ध करुन घ्यावी. अधिक माहितीसाठी कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक