संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यास इच्छूक लाभार्थ्यांनी कर्ज प्रस्ताव सादर करावेत --जिल्हा व्यवस्थापक प्रवीण आहीर

 

अलिबाग,दि.22(जिमाका) :- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित यांच्यामार्फत अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार व मोची इ.) यांच्या आर्थिक शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी राज्य व केंद्र शासनाकडून (एन.एस.एफ.डी.सी.)विविध कर्ज योजना राबविल्या जातात. जिल्हा कार्यालय रायगड यांच्यामार्फत सन 2023 -24 या आर्थिक वर्षाकरिता या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार व मोची इ.) इच्छूक अर्जदारांकडून  कर्ज प्रस्ताव दि.28 जुलै 2023 पर्यंत मागविण्यात येत आहे.

50 टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजना, मुदतीकर्ज योजना, लघुऋण वित्त योजना,  महिला समृद्धी योजना, महिला अधिकारीकरिता योजना, शैक्षणिक कर्ज योजना या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार व मोची इ.)असावा. तसेच अर्जदाराने यापूर्वी मंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराने आवश्यकतेनुसार कागदपत्रांची पूर्तता करून शासकीय योजनांचे तीन प्रतीत अर्ज मूळ कागदपत्रांसह संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय, रायगड, मधुनील, हाउस नं-15, रायवाडी कॉम्प्लेक्स, रूम नं-105, पारिजात गृहनिर्माण संस्था मर्या.पहिला मजला, श्रीबाग नं.2, चेंढरे, ता.अलिबाग येथे सादर करावेत.

कर्ज प्रस्तावाबरोबर अर्जदाराने जातीचा, उत्पन्नाचा, रहिवासी दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड मतदान ओळखपत्र, शैक्षणिक दाखला, 3 छायाचित्र, पॅनकार्ड लाभार्थ्यांचा उद्योग आधार प्रमाणपत्र, लाभार्थ्यांचा सिबील केडीट स्कोअर, ज्या ठिकाणी व्यवसाय करायचा असेल त्या जागेचा पुरावा (जागेचे लाईट बिल, टॅक्स, भाडे पावती, भाडे करारनामा, जागा वापर संमतीपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा इ.) कागदपत्रे खरी असल्याबाबत लाभार्थ्यांचा विनंती अर्ज व ज्या जागी व्यवसाय चालू आहे त्याच जागेचे प्रमाणित केले छायाचित्र, दोन समक्ष जामीनदार (नोकरदार किंवा मालमत्ताधारक, शेतकरी), समक्ष जामीनदारांपैकी नोकरदार असेल तर त्यांच्या कार्यालयाचे लाभार्थ्याने वसुलीचा भरणा केला नाही तर जामीनदाराच्या पगारातून कपात करून भरणा करण्यात येईल असे कार्यालयाचे हमीपत्र, ग्रामपंचायत, नगरपालिका अथवा महानगरपालिका यांचे ना हरकत प्रमाणपत्र, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला, आवश्यकतेनुसार प्रकल्प अहवाल, वाहनाकरिता लायसन्स, परवाना, बॅच, खरेदी करावयाच्या मालमत्तेच्या साहित्याचे जी.एस.टी.क्रमांक असलेले दरपत्रक (कोटेशन),अर्जदाराचे वारसदाराच्या स्वाक्षरीसह नामांकन शपथपत्र (रु.100 च्या स्टॅम्पपेपरवर), अर्जदाराचे तसेच जामीनदारांचे विहित नमुन्यातील शपथपत्र (रु.100 च्या स्टॅम्पपेपरवर),  लाभार्थ्याचा आधारकार्ड क्रमांक तसेच आधार संलग्न बँक खाते क्रमांक.

 या योजनांचे कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या विहीत नमुन्यातील अर्ज दि.28 जुलै 2023 पर्यंत कार्यालयीने वेळेत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय, रायगड, मधुनील, हाउस नं-15, रायवाडी कॉम्प्लेक्स, रूम नं-105, पारिजात गृहनिर्माण संस्था मर्या.पहिला मजला, श्रीबाग नं.2, चेंढरे, ता.अलिबाग या ठिकाणी अर्ज वाटप तसेच कर्ज प्रस्ताव स्वत: प्रत्यक्ष अर्जदाराकडूनच स्विकारले जातील.

 जिल्ह्यातील चर्मकार समाजबांधवांनी महामंडळाच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक प्रवीण आहीर यांनी केले  आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक