दहावी व बारावीच्या 20 जुलै च्या रद्द पुरवणी परीक्षा अनुक्रमे दि.2 व दि.11 ऑगस्ट रोजी होणार

 

अलिबाग,दि.22(जिमाका) :- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट-2023 मध्ये घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी) दि.18 जुलै दि.1 ऑगस्ट 2023 व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) पुरवणी परीक्षा दि.18 जुलै दि.10 ऑगस्ट 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार या परीक्षेचे वेळापत्रक महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले असून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आले आहे. तथापि राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दि.20 जुलै 2023 रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला होता.

त्यामुळे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) पुरवणी परीक्षेतील वेळापत्रकामध्ये दि.20 जुलै 2023 च्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला असून तो पुढीलप्रमाणे आहे.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी)

वेळापत्रकामध्ये निश्चित केलेला दिनांक,वार व दिनांक, सत्र व वेळ- गुरुवार, दि.20 जुलै 2023 सकाळ सत्र 11.00 ते दुपारी 2.00 या दिवशी असलेले सर्व विषयांचे पेपर. वेळापत्रकाबाबत सुधारित तपशिल वार व दिनांक, सत्र व वेळ- बुधवार, दि.2 ऑगस्ट 2023 सकाळ सत्र 11.00 ते दुपारी 2.00 या दिवशी घेण्यात येतील

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी)

वेळापत्रकामध्ये निश्चित केलेला दिनांक, वार व दिनांक, सत्र व वेळ- गुरुवार, दि.20 जुलै 2023 सकाळ सत्र 11.00 ते दुपारी 2.00 या दिवशी असलेले सर्व विषयांचे पेपर. वेळापत्रकाबाबत सुधारित तपशिल वार व दिनांक, सत्र व वेळ- शुक्रवार, दि.11 ऑगस्ट 2023 सकाळ सत्र 11.00 ते दुपारी 2.00 या दिवशी घेण्यात येतील

वेळापत्रकामध्ये निश्चित केलेला दिनांक, वार व दिनांक, सत्र व वेळ- गुरुवार, दि.20 जुलै 2023 दुपार सत्र 3.00 ते सायंकाळी 6.00 या दिवशी असलेले सर्व विषयांचे पेपर. वेळापत्रकाबाबत सुधारित तपशिल वार व दिनांक, सत्र व वेळ- शुक्रवार, दि.11 ऑगस्ट 2023 दुपार सत्र 3.00 ते सायंकाळी 6.00 या दिवशी घेण्यात येतील.

 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) पुरवणी परीक्षा लेखी व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.   तरी वेळापत्रकातील बदलाची जिल्ह्यातील संबंधित माध्यमिक, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य घटकांनी नोंद घ्यावी, असे रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती ज्योत्स्ना शिंदे-पवार यांनी कळविले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक