दि.01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर

 

 

अलिबाग,दि.20(जिमाका):- मा.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि.01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

पुनरिक्षण-पूर्व उपक्रम- मतदार यादी संदर्भातील सर्व कायदे आणि मार्गदर्शक सूचना तसेच नविनतम IT Applilcation आणि प्रणालीबाबत मतदार नोंदणी अधिकारी/सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी/मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना प्रशिक्षण कालावधी दि.01 जून 2023 (गुरुवार) पासून दि.20 जुलै 2023 (गुरुवार).

 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी दि.21 जुलै 2023 (शुक्रवार) ते दि.21 ऑगस्ट, 2023 (सोमवार).

मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणिकरण, मतदार यादी/मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे इ.,आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करुन मतदार यादीत सुधारणा करणे तसेच अस्पष्ट/अंधूक छायाचित्र बदलून त्याऐवजी संबंधित मतदाराकडून योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करुन मतदार यादीत सुधारणा करणे, विभाग/भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करुन मतदान केंद्राच्या सीमांचे पुनर्रचना तयार करून मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे आणि तुलानात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबध्द योजना आखणे, कंट्रोल टेबल अद्यावत करणे यासाठी कालावधी दि.22 ऑगस्ट 2023 (मंगळवार) ते दि.29 सप्टेंबर, 2023 (शुक्रवार).

 नमुना 1-8 तयार करणे,  दि.01 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रित प्रारूप यादी तयार करणे,दि.30 सप्टेंबर 2023 (शनिवार) ते दि.16 ऑक्टोबर, 2023 (सोमवार).

 पुनरिक्षण उपक्रम

एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करणे दि.17 ऑक्टोबर 2023 (मंगळवार), दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दि.17 ऑक्टोबर 2023 (मंगळवार) ते दि.30 नोव्हेंबर 2023 (गुरुवार.

विशेष मोहिमांचा कालावधी- दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत, मुख्य अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी निश्चित केलेले दोन शनिवार व रविवार. दावे व हरकती निकालात काढणे दि.26 डिसेंबर 2023 (मंगळवार)पर्यंत. अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई दि.01 जानेवारी 2024 (सोमवार) पर्यंत. मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे दि.05 जानेवारी 2024 (शुक्रवार).

यानुषंगाने दि.19 जुलै 2023 रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी रायगड डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली ERONET 2.0 व BLO App च्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस रायगड जिल्ह्यातील निवडणूक विभागाचे सर्व निवडणूक नायब तहसिलदार, महसूल सहाय्यक, डाटा एन्ट्री ऑपरेटर व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) उपस्थित होते.

या कार्यक्रमांतर्गत दि.21 जुलै ते दि. 21 ऑगस्ट 2023 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करण्यात येणार असून त्याचा तपशिल पुढीलप्रमाणे- संभाव्य मतदार (दि.01 जानेवारी 2024 रोजी पात्र होणारे), नोंदणी न केलेले पात्र मतदार (दि.10 ऑक्टोबर 2023 रोजी पात्र असलेले), संभाव्य मतदार (दि.01 एप्रिल, दि.01 जुलै, दि.01 ऑक्टोबर तीन अर्हता दिनांकावर पात्र होणारे), एकापेक्षा अधिक नोंदी/मयत मतदार/कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदार, मतदार यादीतील नोंदीत दुरुस्ती.

तसेच Voter Helpline App/Voter Service Portal या वेबसाईट वरुन मतदार नाव नोंदणी, वगळणी, दुरुस्तीसाठी अर्ज करु शकतात. दि.01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत पुनरिक्षण-पूर्व उपक्रम राबविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय व सहा.मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांचे कार्यालय यांच्याशी संपर्क साधण्यात यावा.

तरी रायगड जिल्ह्यातील मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 च्या अनुषंगाने सहकार्य करावे] असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रायगड डॉ.योगेश म्हसे  व  उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे  यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक