दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण गरजू दिव्यांगानी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा

 

 

अलिबाग,दि.20(जिमाका):- दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा परिषद, सांगली अंतर्गत कार्यरतत शासकीय प्रौढ़ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगासाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे. या संस्थेतील प्रशिक्षण वर्गांना महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, मुंबई यांची शासन मान्यता आहे. या संस्थेला अखिल भारतीय स्तरावरील FICCI AWARD 1999 हा प्राप्त झाला आहे.

सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणे सुरु आहे. माफक जागा असल्याने त्वरीत संपर्क साधा.

प्रवेशासाठी नियम अटी व सवलती आणि शैक्षणिक  पात्रता पुढीलप्रमाणे- सर्टिफिकेट इन कॉम्युटर ऑपरेशन वुईथ एम.एस. ऑफिस (संगणक कोर्स) किमान इ. 8 वी पास, मोटार अॅंड आमेंचर वायडींग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज, (इलेक्ट्रीक कोर्स)किमान इ. 9 वी पास असे आवश्यक आहे. यासाठी वयोमर्यादा  16 से 40 वर्ष, प्रशिक्षण कालावधी-1 वर्ष, फक्त दिव्यांग मुलांनाच प्रवेश दिला जातो.

या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय, अद्यावत व परीपूर्ण संगणक कार्यशाळा,भरपूर प्रॅक्टीकल्स व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण,नेटवर्कींग व इंटरनेटची सुविधा,अनुभवी व तज्ञ निदेशक, उज्वल यशाची परंपरा,  समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी व्यवसायासाठी बीज भांडवल योजना अशाप्रकारे सोई व सवलती दिल्या जाणार आहेत.

            अर्ज केव्हा, कसे व कोठे करावेत :-प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधिक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, मिरज ता.मिरज,जि.सांगली-416410, दू.क्र.0233-2222908, मो.क्र. 9922577561/9595667936 या पत्यावर पोस्टाद्वारे किंवा समक्ष मोफत मिळतील. प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. प्रवेश अर्ज पूर्णपणे भरून फोटोसह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरून द्यावेत, प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, एसएससी मार्कशिट व प्रमाणपत्र अपंगत्व असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, युडीआयडी कार्ड, डोमासाईल प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज संस्थेकडे पाठवावेत. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ञ समिती व्दारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येईल.

तरी माफक जागा असल्याने गरजू दिव्यांगानी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मिरज येथील शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्राच्या अधीकांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक