शेतकऱ्यांना आता केवळ 1/- रुपयात पिक विमा मिळणार योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत दि.31 जुलै पर्यंत--जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले

 

 

अलिबाग, दि.22 (जिमाका):-  जिल्हयात प्रधानमंत्री पिक विमा योजना Cup & Cap Model (80:110) नुसार खरीप 2023 ते रब्बी 2025 26 हंगामातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार रायगड जिल्हयात चोलामंडलम एम.एस.जनरल इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पिक ॲपव्दारे आपल्या पिकांची नोंदी 7/12 उताऱ्यावर करणे आवश्यक असल्याने या नोंदी लवकरात लवकर करुन घेवून प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी (दि.19 जुलै) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथील पत्रकार परिषदेत दिली.

 

योजनेची उद्दीष्टे:- नैसर्गिक आपत्ती, किड आदि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.

योजनेची वैशिष्टे व लाभार्थी पात्रता :- कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कुळाने अथवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी, प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत शेतकनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रू. 1 आहे.

 योजना कार्यान्वयीन यंत्रणा:- रायगड जिल्हयात चोलामंडलम एम. एस. जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत राबविण्यात येणार आहे. अधिसूचित पिके-विमा संरक्षित रक्कम भात पिकासाठी प्रति हेक्टरी रक्कम रू. 51 हजार 760 नागली पिकासाठी प्रति हेक्टरी रक्कम रु. 20  हजार एवढी आहे. आपले सरकार सेवा केंद्र (CSC) धारकाला विमा कंपनी मार्फत प्रति अर्ज रक्कम रू. 40/- देण्यात येते तरी शेतकन्याला अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.

 जोखमीच्या बाबी :- प्रधानमंत्री पिकविमा योजनेंतर्गत पुढील कारणांमुळे म्हणजेच शेतकऱ्यांना टाळता न येण्याजोग्या कारणांमुळे झालेल्या नुकसानीस विमा संरक्षण मिळेल. प्रतिकूल हवामान घटकांमुळे पेरणी/लावणी/ उगवण न होणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान (Mid- Season Adversity), पिक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट (Standing Crops) स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Localized Calamities),काढणी पश्चात नुकसान (Post Harvest Losses).

पिकाच्या हंगामामध्ये प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांवर होणारे नुकसान (Mid Season Adversity) पिक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत नसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलयू होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पादनात होणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे होणारे नुकसान, (Localized Calamities) नैसर्गिक कारणांमुळे पिकाचे होणारे काढणीपश्चात नुकसान, (Post Harvest Losses) या बाबीचा समावेश आहे. या योजनेंतर्गत शेतकरी हिस्स्याचा भार सुध्दा शेतकऱ्यांवर न ठेवता शेतकऱ्यांच्या हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येईल. त्यामुळे सन 2023-24 पासून शेतकऱ्यांना केवळ 1/- रू भरून पिक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल. प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत निश्चित करण्यात आलेली शेतकरी हिस्स्याची पिकनिहाय प्रति हेक्टरी विमा हप्ता रक्कम व शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात मरावयाचा विमा हप्ता रक्कम रु.1/- वजा जाता उर्वरीत फरकाची रक्कम राज्य हिस्सा अनुदान म्हणून राज्य शासनामार्फत अदा करण्यात येईल.

तरी विमा हप्ता भरण्यासाठी शेतकऱ्यांनी चोलामंडलम एम.एस.जनरल इन्शुरन्स कंपनीचे तालुका कार्यालय, सर्व राष्ट्रीयकृत व सहकारी बँका, सी.एस.सी सेंटर किंवा पिक विमा पोर्टल (https://pmfbygovin) येथे सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहीतीकरिता आपले तालुक्याचे कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक