शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेचे प्रस्ताव सादर करण्यासाठी दि.10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

 

 

अलिबाग,दि.20(जिमाका):- अल्पसंख्यांक विकास विभागाकडून धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन-2023-24 साठी प्रस्ताव सादर करण्यासाठी दि.17 जुलै 2023 च्या शासन परिपत्रकानुसार दि.10 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

तरी रायगड जिल्ह्यातील इच्छूक शाळांनी सन-2023-24 या आर्थिक वर्षाकरिता विहीत नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्याकडे दि.10 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन तथा सदस्य सचिव, उच्चस्तरीय निवड समिती, रायगड-अलिबाग श्री.ज.द.मेहेत्रे यांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक