महाज्योतीच्या 20 प्रशिक्षणार्थ्यांची विक्रीकर सहाय्यक पदी निवड! राहुल विजय जेंगठे राज्यात प्रथम

 

 

अलिबाग,दि.20(जिमाका):- महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्गविमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्यात तसेच केंद्र शासनात सेवेची संधी प्राप्त व्हावी याकरीता एम.पी.एस.सी परीक्षा प्रशिक्षण योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत विद्यार्थ्याच्या आर्थिक तसेच शैक्षणिक गरजा लक्षात घेता विद्यावेतनही पुरवल्या जाते.

वर्ष 2020-21 या आर्थिक वर्षात  इतर मागास वर्गविमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी परिक्षा प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेत सहभाग घेण्यासाठी जाहिरातीच्या माध्यमातून नॉनक्रिमिलेअर उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांकडून महाज्योतीच्या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येतात. पात्र विद्यार्थ्यांना एम.पी.एस.सी परीक्षा प्रशिक्षण योजनेत सहभाग दिला जातो.

नुकतेच एम.पी.एस.सी परीक्षा प्रशिक्षणातून 20 प्रशिक्षणार्थ्यांची विक्रीकर सहाय्यक पदी निवड झालेली आहे. यात 14 इतर मागास वर्ग,  5 विमुक्त जाती-जमाती, 1 विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थांचा समावेश आहे. यशस्वी उमेदवारांमधे गायत्री गलखेपियुष डोंगरेमारुती शेंदगेरुपाली खाडेजलिंदर कसारपोपट करांदेसत्यजीत साबळे, संतोष अंबुलेऋतुजा मसाळअविनाश वाघमारेमयुर लोणकारपरेश भावसारस्वाती डोंगरे, मयुर देवरेजगदिश केदारहरीश शिंदेवैभव नन्नवरेरिंकल हडकेप्रशांत बोरकुट या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे यातील राहुल जेंगठे हा विद्यार्थी राज्यात पहिला आला आहे. राहुलने आपल्या या यशाचे श्रेय आपल्या पालकासोबत महाज्योतीलामहाज्योतीच्या प्रशिक्षक वर्गाला तसेच प्रशिक्षणा दरम्यान दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाला दिलेले आहे

इतर मागास बहुजन कल्याणसरकारमंत्री, तथा अध्यक्ष महाज्योतीनागपूर यांनी मा.ना.श्री.अतुल सावे  सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. राहुल जेंगठे या विद्यार्थ्याचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांनी एमपीएससी परिक्षा प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. व्यवस्थापकीय संचालक महाज्योतीनागपूर श्री.राजेश खवले यांनी सर्व  विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक