क्षयरोग नियंत्रणासाठी आरोग्ययंत्रणांचा समन्वय आवश्यक-जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29-सन 2025 पर्यंत देशातून क्षयरोग निर्मुलन करण्यासाठी प्रत्येक क्षयरुग्णाचे उपचाराच्या सनियंत्रण करुन उपचार पुर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी क्षयरुग्णांवर उपचार करावे, शासकीय, खाजगी वैद्यकीय यंत्रणा,औषध विक्रेते यंत्रणेसाठी समन्वय राखावा व प्रत्येक रुग्णांवर पुर्ण उपचार होईल याकडे लक्ष द्यावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिले.
जिल्हा क्षयरोग नियंत्रणासंदर्भात आज जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई,जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ.एस.के.देवकर,जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ.अमित कराड, आयएमए  अलिबागचे डॉ.सुधाकर बडगिरे,अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहा.आयुक्त डॉ.गिरीष हुकरे,पनवेल येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.पद्मिनी येवले आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.देवकर यांनी माहिती दिली की, देशातून क्षयरोग हद्दपार करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2025 पर्यंतचे उदीष्ट ठरविले आहे. जिल्ह्यात सन 2017 अखेर 3544 क्षयरुग्ण आढळले आहेत. हे रुग्ण शासकीय,वैद्यकीय यंत्रणाकडील आहेत. तर खाजगी वैद्यकीय सेवांकडे उपचार घेणारांची संख्या 1079 आहे.जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांची माहिती व रुग्ण पूर्ण बरा होईपर्यंतचा पाठपुरावा याबाबत माहिती उपलब्ध होण्यासाठी खाजगी वैद्यकीय व्यावसायिक आणि औषध विक्रेत्यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेस सहकार्य करणे आवश्यक आहे. या संदर्भात केंद्र व राज्य आरोग्य मंत्रालयाकडून यापूर्वीचे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.तथापि, या सर्व खाजगी व शासकीय वैद्यकीय यंत्रणांचा परस्पर समन्वय आवश्यक आहे. निदान झालेल्या क्षयरुग्णावर उपचार पूर्ण होणे  आवश्यक आहे. अर्धवट उपचार केल्यास रुग्ण हा दाद न देणाऱ्या क्षयरोग जंतुंचा वाहक(एमडीआर) बनतो. व नंतर त्यास उच्च पातळीचे उपचार करावे लागतात. त्यासाठी खाजगी डॉक्टर्स,क्षयरोग निदानाच्या चाचण्या करणारे प्रयोगशाळा तंत्रज्ञ व औषध विक्रेते यांच्याशी शासकीय यंत्रणा परस्परांशी समन्वय राखतील. उपचार पुर्ण करणारे रुग्ण, डॉक्टर्स,औषध विक्रेते यांना प्रोत्साहनपर अनुदान देणे अशा प्रकारच्या उपयायोजना राबवून उपचार पुर्ण करुन क्षयरोग निर्मुलनाचे उदिष्ट पुर्ण करावयाचे आहे. यासाठी सर्व संबंधितांची समन्वय ठेवावा असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी  दिले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड