पनवेल येथे अद्यावत क्रिकेट अकॅडमी तयार करणार-शालेय शिक्षण आणि क्रीडामंत्री ना.विनोद तावडे






अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.02- पनवेल येथे अद्यावत क्रिकेट अकॅडमी तयार करणार अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण,उच्च व तंत्रशिक्षण,वैद्यकीय शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे यांनी पनवेल येथील तालुका क्रीडा संकुल बहुउद्देशीय हॉल लोकार्पण सोहळ्यात दिली.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार रामशेठ ठाकूर,उपमहापौर चारुशिला घरत, तहसिलदार दिपक आडके, कार्य अधिकारी मंत्रालय कविता नांवदे,उपसंचालक क्रीडा व युवक एन.बी.मोटे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, क्रीडा अधिकारी श्री.राठी, क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक, नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना मंत्रीमहोदय म्हणाले की, शासन खेळाडूंना सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करुन देणार आहे.  क्रीडा संकुलामध्ये खेळाडूंना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील.  खेळाडूंनी आपले नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर करावे. जे खेळाडू जिल्हा पातळीवर,राज्य पातळीवर तसेच देश पातळीवर खेळतील त्यांना दहावी,बारावीच्या परिक्षेमध्ये 25/15 मार्क देण्यात येतील.   तसेच पुरस्कार प्राप्त खेळाडूंना शासकीय नोकरीमध्ये         5 टक्के कोटा आरक्षण मिळणार आहे.   खेळाडूंनी योग्यप्रकारे नियोजन करुन आपल्या खेळात प्राविण्य मिळवावे व आपल्या देशाचे नाव उज्वल करावे.  त्यासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा शासनाकडून पुरविण्यात येतील. मुंबईच्या नजिक असलेल्या पनवेल शहराचा वाढता विस्तार विचारात घेता खेळाडू व नागरिकांना खेळाचा सराव तसेच व्यायाम करण्यासाठी विविध खेळांच्या दर्जेदार संकुलाची नितांत गरज असून तालुका क्रीडा संकुलाच्या माध्यमातून त्याची पुर्तता करणे शक्य होत आहे.   तथापि शासन अनुदानाची मर्यादा विचारात घेता दुस-या टप्प्यातील कामे जलदगतीने पुर्ण होण्याकामी विशेष बाब म्हणून शासनाकडून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.  यावेळी त्यांनी उपस्थित पालक व खेळाडूंशी संवाद साधला तसेच पालकांना व खेळाडूंना येणार्‍या अडीअडचणी जाणून घेऊन व त्याचे निराकरण केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. यावेळी त्यांनी खेळाडूंना त्यांच्या मागणीनुसार सेवा सुविधा पुरविण्यात येतील त्यांच्या खेळाला,कौशल्यांना चालना देण्यात येईल.    क्रीडा संकुलामुळे सर्व सामान्य खेळाडूंना आपल्या खेळातील प्राविण्य दाखवून जिल्हा, राज्य व देशपातळीवर नाव कमावता येईल.   शिक्षण व क्रीडा क्षेत्राला पनवेल महानगरपालिका सदैव प्रोत्साहन देईल.
यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते विविध खेळात प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास विविध खेळाडू,प्रशिक्षक,पालक,विद्यार्थी,पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक