‘सोशल मीडिया महामित्र’ उपक्रमात युवकांनी मोठ्या संख्येने नोंदणी करावी


          अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1 राज्य शासनाच्या ‘सोशल मीडिया महामित्र’ या अभिनव उपक्रमात कोकण विभागातील जास्तात जास्त युवकांनी सहभागी होऊन नोंदणी करण्याचे आवाहन राज्य शासनातर्फे करण्यात आले आहे.
हा उपक्रम कशासाठी ?
आधुनिक काळात सोशल मीडिया अत्यंत प्रभावी झाला आहे. बहुतांश युवक मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडिया आता मनोरंजनाचे साधन न राहता ज्ञान उपलब्ध करुन घेण्याचे प्रभावी साधन ठरले आहे. लोकांची मने आणि मते घडविण्याची ताकद सोशल मीडियामध्ये असल्याचे अनेकदा सिध्द झाले आहे. देशातील बहुतांश युवक फेसबुक, व्हॉट्ॲप, इन्स्टाग्राम, ट्विटर आदींचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळे शासनाने सोशल मीडियाची ताकद जाणून ‘सोशल मीडिया महामित्र’ उपक्रम राबविण्याचा ठरविले आहे.
नोंदणी अशी करा
या उपक्रमामध्ये सहभागी होण्याकरिता Google Playstore अथवाApple च्या Appstore वर MahaMitra हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करावे लागेल.
या ॲप्लीकेशनमध्ये नाव, वय, पत्ता हे तपशील देऊन नोंदणी करावयाची आहे. ही नोंदणी प्रक्रिया 1 फेब्रुवारी 2018 रोजी सुरु होणार असून 18 फेब्रुवारी 2018 पर्यंत नोंदणी करता येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 15वर्षावरील रहिवासी नि:शुल्क सहभागी होऊ शकेल.
गट चर्चेमध्ये सहभागी व्हा
राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर समाज माध्यमांच्या सदुपयोगाबाबत 5 ते 17 मार्च 2018 दरम्यान गटचर्चा होणार आहे. यात प्रत्येक तालुक्यातील 10 सोशल मीडिया महामित्र सहभागी होतील. यातून तालुक्यातील एकाची राज्यस्तरीय गटचर्चा होईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षक यांच्यासमवेत ही गटचर्चा आयोजित करण्यात येईल. 
अंतिम सोहळा
राज्यस्तरासाठी निवड झालेल्यांना मुंबईत जाण्यासाठी निमंत्रण, मान्यवरांसोबत सेल्फी, कॉफी, आपले विचार मांडण्याची संधी, मुख्यमंत्री यांचेसोबत फोटो, पारितोषिक व अन्य भेटवस्तू देण्यात येणार आहे. या संधीचा अधिकाधिक युवकांनी लाभ घेऊन सोशल मीडिया महामित्र म्हणून पारितोषिक पटकावावे असे आवाहन माहिती व जनसंपर्क विभागातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी www.mahamitra.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड