उंबर्डे येथे शनिवारी एकात्मिक राज्य जलआराखडा कार्यशाळा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.31- उंबर्डे ता. पेण येथील हेटवणे मध्यम प्रकल्प उपविभाग येथे शनिवार दि.3 फेब्रुवारी रोजी पश्चिम वाहिनी नदी खोरे विकासासंदर्भात एकात्मिक राज्य जलआराखडा कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
            पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यातील पाताळगंगा,अंबा, कुंडलिका, म्ह्सळा, सावित्री, भारजा या उपखोऱ्यांचा एकात्मिक राज्य जल आराखडा प्रारुप स्वरुपात  तयार करण्यात आला आहे. जल आराखडा मसुद्यावर  उपखोऱ्यातील संबंधित लाभार्थी, पाणी वापरकर्ते यांचेशी सल्ला मसलत करुन जल आराखडा विषयी मते जाणून घेण्याकरिता शनिवार दि.3 फेब्रुवारी रोजी हेटवणे मध्यम प्रकल्प उपविभाग, पेण उंबर्डे,जि.रायगड येथे  कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यशाळेस उपस्थित राहावे,असे आवाहन इंजि.प्र.बा.मिसाळ,अधिक्षक अभियंता,उत्तर कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ,कळवा, ठाणे, यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक