छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 वंचित शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी आणखी एक संधी


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.31- राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना -2017 अंतर्गत शेतकरी सभासदांनी राज्य शासनाने पोर्टलवर ऑनलाईन माहिती भरुन अर्ज सादर केले आहेत. तसेच बँकेने शासनाला सादर केलेल्या त्यांच्या माहितीशी शेतकऱ्यांनी दिलेली माहिती जुळत नसल्याने अशा शेतकऱ्यांची यादी राज्य् शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,राष्ट्रीयकृत व खाजगी बँक,महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे पाठविली आहे.या याद्यां वरील बँकांच्या सर्व संबंधित शाखा स्तरावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
राज्य शासनाने पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या ज्या शेतकऱ्यांचे नाव आतापर्यंत राज्यशासनाने कर्जमाफी मंजूर केलेल्या लाभार्थींचे यादीमध्ये नाही, अशा शेतकऱ्यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राष्ट्रीयकृत व खाजगी बँक,महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या संबंधित बँक शाखांशी त्वरीत संपर्क साधून बँकेने नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये आपले नाव असल्यास आवश्यक कागदपत्रांसह योग्य माहिती बँकांच्या शाखांना सादर करावी  ज्या आधारे बँक शाखांना पुढील कार्यवाही करता येईल.कार्यवाहीचा अंतिम  दिनांक 5 फेब्रुवारी पूर्वी असून विनाविलंग आवश्यक पूर्तता करुन राज्य शासनाच्या कर्जमाफी योजेनेचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना घेता यावा. त्याचप्रमाणे रु. दीड लाखापेक्षा अधिक कर्जबाकी असलेल्या ज्या शेतकऱ्यांना राज्य शासनाचे रु.दीड लाखाची कर्जमाफी रक्कम मंजूर केलेली आहे,अशा शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील उर्वरित कर्जाच्या रक्कमेचा भरणा करण्याबाबत संबंधित बँकांच्या शाखांनी पत्राद्वारे कळविलेले आहेच. तसेच शेतकऱ्यांनी देखील त्यांच्याकडील उर्वरित रकमेचा त्वरीत भरणा करुन राज्यशासनाच्या एकमुख कर्ज परतफेड योजनेचा लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,रायगड अलिबाग यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक