छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30-छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 या योजने अंतर्गत पात्र ठरलेल्या अर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी आवश्यक त्या याद्या व रकमा सर्व बँकाना ऑनलाईन पद्धतीने वितरीत करण्यात आलेल्या आहेत व त्यानुसार अंमलबजावणी सुरु आहे.
            या प्रक्रीयेमध्ये ज्या प्रकरणी बँकाना पुरविलेल्या कर्ज खात्यांच्या माहितीतील त्रुटी तसेच शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये असलेल्या अपुऱ्या माहितीमुळे ताळमेळ होऊ शकला नाही अशा प्रकरणातील शेतकऱ्यांच्या बाबतीत प्रक्रीया होऊन निर्णय घेणे शक्य होत नाही.  अशा प्रकरणांतील शेतकऱ्यांच्या अर्जातील माहितीची,बँकेकडील असलेल्या माहितीच्या आधारे शहानिशा करुन त्याची पात्रता,अपात्रता निश्चित करण्याची जबाबदारी तालुकास्तरीय समितीकडे सोपविण्यात आली आहे. याबाबत बँकेने त्यांच्या प्रत्येक शाखेमध्ये ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही त्यांच्या याद्या बँक स्तरावर प्रसिद्ध करण्यात आल्या असून जे शेतकरी या योजनेस पात्र आहेत त्यांनी ऑनलाईन अर्ज देखील भरणा केला आहे. परंतु बँकेच्या चूकीच्या माहिती भरणामुळे किंवा शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरणा करणेमध्ये केलेल्या चुकीमुळे अशा शेतकऱ्यांची नावे ग्रीन यादीमध्ये आली नाहीत असे शेतकरी या योजनेचा लाभ मिळणेपासून वंचित राहिलेले आहेत. त्यांना शासनाने पुन्हा एकदा संधी दिलेली असून तालुका स्तरावर तालुका स्तरीय समिती नियुक्त केली आहे.   या तालुका स्तरीय समितीचे अध्यक्ष त्या त्या तालुक्याचे सहाय्यक निबंधक तसेच सदस्य सचिव म्हणून तालुका लेखापरिक्षक तसेच सदस्य बँक शाखांचे शाखाधिकारी,बँक निरिक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच आपल्या जिल्ह्यातील जे शेतकरी पात्र असून देखील त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा त्यांची नावे ग्रीन यादी मध्ये  आलेली नाहीत अशा शेतकऱ्यांनी त्यांनी कर्ज घेतलेल्या बँकेच्या शाखांशी किंवा त्यांच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांशी संपर्क साधून यादीची पडताळणी करुन त्यांनी बँक शाखाधिकारी किंवा तालुका सहाय्यक निबंधक यांचेशी संपर्क साधून त्याप्रमाणे या समितीकडे अर्ज द्यावा व या योजनेचा लाभ प्राप्त करुन घ्यावा असे आवाहन पांडुरंग खोडका, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रायगड तसेच जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-1,  यु.जी. तुपे व मुख्य कार्यकारी अधिकारी जि.म.स.बँक यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक