उरण तालुक्यातील जेएनपीटी टाऊनशिप परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित




अलिबाग,जि.रायगड, दि.17 (जिमाका) : जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जेएनपीटी टाऊनशिप येथे दोन व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहत असलेले जेएनपीटी टाऊनशिप ता.उरण येथील रुग्ण राहत असलेल्या घराचा परिसर, जेएनपीटी टाऊनशिप, सेक्टर-1, बिल्डिंग नं.22, पूर्वेला 20 व 22 बिल्डिंग मधील गल्ली, पश्चिमेस बिल्डिंग 22 कडे जाणारा मुख्य रस्ता, दक्षिणेस प्लॉट नं.बी-25, सेक्टर-1, बिल्डिंगमध्ये जाणारा रस्ता हा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे.
या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड  श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.  
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे.
००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक