पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा दौरा कार्यक्रम



अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका)- उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे.
 बुधवार दि.17 जून, 2020 रोजी दुपारी 2.30 वा. सुनिती शासकीय निवासस्थान येथून मोटारीने पनवेल, जि.रायगडकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. पनवेल येथे आगमन व मौजे खैरवाडी, ता.पनवेल येथे निसर्ग चक्रीवादळाने बाधित भागाची पाहणी. सायं. 4.00 वा. खैरवाडी ता.पनवेल येथून बिड, ता.खालापूरकडे प्रयाण. (हाळरबुग मार्गे). सायं. 4.30 वा. बिड येथे आगमन व जामरुंग आदिवासीवाडी येथे निसर्ग चक्रीवादळ बाधित भागाची पाहणी. सायं. 5.00 वा. बिड, ता.खालापूर येथून खोपोली नगरपरिषदेकडे प्रयाण. सायं. 5.15 वा. खोपोली नगरपरिषदेस भेट व अधिकाऱ्यांसमवेत कोविड-19 च्या संक्रमणाबाबत चर्चा. सायं. 5.45 वा. खोपोली येथून चिंचवली, गोहे आदिवासीवाडी, ता.खालापूरकडे प्रयाण. सांय. 6.00 वा. चिंचवली गोहे आदिवासीवाडी येथील निसर्ग चक्रीवादळ बाधित भागाची पाहणी. सायं. 6.30 वा. चिंचवली येथून पाली-वाकण-कोलाड मार्गे सुतारवाडी ता.रोहाकडे प्रयाण. रात्रौ 8.30 वा. सुतारवाडी येथे आगमन व राखीव.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड