उरण तालुक्यातील सुरकीचा पाडा, चाणजे वगळले Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) प्रतिबंधित क्षेत्रातून




अलिबाग,जि.रायगड, दि.11 (जिमाका) : जिल्ह्यातील उरण तालुक्यातील सुरकीचा पाडा, चाणजे येथे करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या घराच्या पूर्वेला शंकर अर्जून कोळी यांच्या घराशेजारील गल्ली तसेच गोरख आयत्या पाटील व हरिश्चंद्र आयत्या पाटील यांच्या घरामधील गल्ली, पश्चिमेला प्रभाकर गजानन थळी व रविंद्र धर्मा थळी तसेच दयानंद हॉटेलची गल्ली यांच्या घरामधील गल्ली, दक्षिणेला किशोर काशिनाथ म्हात्रे व संजय धनाजी चव्हाण यांच्या दुकानामधील गल्ली तसेच मच्छिंद्र बाळाराम पाटील ते जितेंद्र हरि नाखवा यांच्या घरामधील गल्ली व भवानी चौक येथील जेटीकडे जाणारा अर्धा रस्ता, उत्तरेला उर्वरित सुरकीचा पाडा  तसेच या झोन मधील क्षेत्र वाढवून ते करोना बाधित रुग्ण राहत असलेल्या घरापासून पूर्वेला डॉ.प्रकाश नाखवा यांचे घराजवळील रस्ता, पश्चिमेला संजय मधुकर नाखवा व सत्यम गजानन कोळी यांचे घरामधील गल्ली, दक्षिणेला जेटी कडील भवानी चौक, उत्तरेला रामेश्वर प्रोव्हिजन स्टोअर बाजूची गल्ली हा वाढीव परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली होती.
मात्र आता मौजे चाणजे ता.उरण येथील एकूण 134 करोना बाधित रुग्णांपैकी 131 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून  घरी परतले आहे. फक्त 3 रुग्ण घरी परतण्याचे शिल्लक आहे.
त्यामुळे या परिसरातील 3 रुग्णांच्या घरांचे क्षेत्र वगळून Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) व प्रतिबंध क्षेत्रामधून वगळण्याचे जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आदेश दिले आहेत.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक