चक्रीवादळात नुकसान झालेल्या रोहा तालुक्यातील नुकसानग्रस्तांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश सुपूर्द




अलिबाग,जि.रायगड, दि. 14 (जिमाका) :-  जिल्ह्यातील दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे  जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. 
या चक्रीवादळात नुकसान झालेल्या रोहा तालुक्यातील ऐनघर ग्रामपंचायतीतील नुकसानग्रस्त विश्वनाथ विनायक गायकवाड-हेदवली रु.15 हजार, हिरा दयाराम वारगुडी-खैरवाडी रु.15 हजार, तानाजी गुणाजी वारगुडी-खैरवाडी रु.15 हजार, लक्ष्मण मोरा शिर्के-ऐनघर रु.15 हजार, मंगला दिनेश कातकरी-सुकेली आवाडी रु.15 हजार, संगिता गंगाराम बावदाने- सुकेली धनगरवाडी रु.15 हजार, देवूबाई शंकर बावदाने- सुकेली धनगरवाडी रु.15 हजार, पार्वती काशिराम शिद- सुकेली गणपतीवाडी रु.15 हजार, सुरेश भाग्या वाघमारे-हेदवली मांडवशेत रु.15 हजार, असे एकूण 1 लाख 35 हजार रुपयांचे  मदतीचे धनादेश पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य किशोरशेठ जैन, पं.स.सदस्य संजय भोसले, मा.सभापती सदानंद गायकर, ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत तानू शिंदे, उपसरपंच दिनेश धोंडू जाधव व ग्रा.पं.सदस्य अरुण तांडेल, मंगेश साळवी, प्रांताधिकारी डॉ.यशवंत माने, कृषी अधिकारी अशोक महामुनी, विस्तार अधिकारी महारुद्र फरतडे, सहाय्यक गटविकास अधिकारी पंडीत राठोड, मंडळ अधिकारी दिपक चिपळूणकर आदि उपस्थित होते.
रोहा तालुक्यातील नागोठणे ग्रामपंचायत
हद्दीतील नुकसानग्रस्तांना धनादेश वाटप
रोहा तालुक्यातील नागोठणे ग्रामपंचायतीतील नुकसानग्रस्त यशवंत नारायण मढवी-निडी तर्फे नागोठणे रु.15 हजार, बाळाराम यशवंत मढवी-निडी तर्फे नागोठणे रु.15 हजार, गुलाबा गोपाळ म्हात्रे-निडी तर्फे नागोठणे रु.15 हजार, एकनाथ कोडिंबा देवरे-चिकणी रु.15 हजार, येसू बबन पवार-चिकणी 1 लाख 58 हजार 500, परशुराम राणे रु.15 हजार,  सुरेश बारकू पवार रु.15 हजार, सुभाष हरिश्चंद्र जैन रु.15 हजार, नामदेव हिरु ताडकर रु.15 हजार, अशोक हिरामण पवार-पाटणसई रु.15 हजार,  धर्मा राघू पवार रु.15 हजार, असे एकूण 3 लाख 8 हजार 500 रुपयांचे  मदतीचे धनादेश पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य किशोरशेठ जैन, पं.स.सदस्य संजय भोसले, ग्रामपंचायतीचे सरपंच मिलींद धात्रक, मा.प.स.सभापती सदानंद गायकर, मा.उपभापती शिवराम भाऊ शिंदे, प्रांताधिकारी डॉ.यशवंत माने, कृषी अधिकारी अशोक महामुनी, विस्तार अधिकारी महारुद्र फरतडे, सहाय्यक गटविकास अधिकारी पंडीत राठोड, मंडळ अधिकारी अरुण तांडेल उपस्थित होते.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड