जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 28 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड
(जिमाका) दि.16- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी
28.54 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 320.31
मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान
अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग
28.00 मि.मि., पेण-18.00 मि.मि., मुरुड-34.00 मि.मि., पनवेल-2.20 मि.मि., उरण-2.00
मि.मि., कर्जत-42.00 मि.मि., खालापूर-45.00 मि.मि., माणगांव-25.00 मि.मि.,
रोहा-25.00 मि.मि., सुधागड-12.00 मि.मि., तळा-28.00 मि.मि., महाड-12.00 मि.मि.,
पोलादपूर-25.00, म्हसळा-42.00मि.मि., श्रीवर्धन-65.00 मि.मि., माथेरान-51.40
मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 456.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 28.54 मि.
मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 10.19 टक्के
इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment