एआरटी केंद्र, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे एचआयव्ही संसर्गितांना धान्याचे वाटप



अलिबाग,जि.रायगड, दि.16(जिमाका) : आधार ट्रस्ट पनवेल संस्थेमार्फत एआरटी केंद्र, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे नियमित एआरटी औषधे घेण्याकरीता आलेल्या एचआयव्ही संसर्गितांना जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग, डॉ. प्रमोद गवई यांच्या मार्गदर्शनानुसार अत्यंत आवश्यक अशा धान्याचे वाटप (दि.15 जून रोजी) करण्यात आले.
यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, संजय माने, जिल्हा आयसीटीसी पर्यवेक्षक नवनाथ लबडे,   जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, रायगड, पांडुरंग शिंदे, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, डॉ.नालंदा तसेच आधार ट्रस्ट पनवेलचे  सुनील पटेल, जागृती गुंजाळ, हेमंत माळी आणि  जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, रायगड व एआरटी  अलिबाग येथील कर्मचारी उपस्थित होते.
            आधार ट्रस्ट पनवेल यांच्याकडून अलिबाग येथील एआरटी केंद्रामध्ये  उपचाराकरीता आलेल्या  40 एचआयव्ही संसर्गित यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे  पनवेल, खालापूर, कर्जत येथील 110 एचआयव्ही संसर्गित यांना तांदूळ 3 किलो, गहू 5 किलो, तूरडाळ 1 किलो, मुगडाळ 1 किलो, चणाडाळ 2 किलो, साखर 2 किलो, शेंगदाणे 1 किलो, तूप अर्धा किलो, तेल 1 किलो, सोयाबीन 1 किलो, पोहे 2 किलो, चहापावडर पाव किलो, सर्व प्रकारचे  मसाले अर्धा किलो असे एकूण 25 किलो साहित्याचे किट वाटप करण्यात आले. यावेळी  आधार ट्रस्ट पनवेल या संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या सहकार्याबद्दल उपस्थित एचआयव्ही संसर्गितांनी संस्थेचे आभार व्यक्त केले.
        तसेच धान्य वाटप कार्यक्रमानंतर एआरटी केंद्र अलिबाग येथे अधिकारी व कर्मचारी यांच्या  उपस्थितीत  आधार ट्रस्ट पनवेल संस्थेसोबत बैठक घेण्यात आली.  या बैठकीमध्ये एआरटी केंद्र अलिबाग व धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, लोधीवली, या एआरटी केंद्रामध्ये LFU  (Lost to followup) व miss  (एआरटी केंद्रामध्ये औषधोचाराकरिता न आलेल्या) व व्यक्तींचा पाठपुरावा घेऊन ते पुन्हा एआरटी केंद्रामध्ये एआरटी उपचाराकरिता येतील याकरिता संस्थेने प्रयत्न करावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले. या दोन्ही एआरटी केंद्र व रायगड जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांतील आयसीटीसी केंद्रामध्ये येऊन औषधे घेऊन न जाणाऱ्या व्यक्तींच्या घरापर्यंत जाऊन त्यांना एआरटी औषधे संस्थेमार्फत देण्यात यावीत असेही ठरविण्यात आले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक