चक्रीवादळात नुकसान झालेल्या पेण तालुक्यातील नुकसानग्रस्तांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश सुपूर्द




अलिबाग,जि.रायगड, दि. 18 (जिमाका) :-  जिल्ह्यातील दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे  जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. 
या चक्रीवादळात नुकसान झालेल्या  पेण तालुक्यातील भिक्या धर्मा पवार, बेलवडे बुद्रुक (प्रधानवाडी), रु.1 लाख 50 हजार, नथू रामदास वाघमारे, मुंगोशी (प्रधानवाडी), रु.72 हजार, वामन नामदेव आधान, अंधार्ने, रु. 1 लाख, सोमा गणपत वाघमारे, बोरगाव, रु.1 लाख 50 हजार,  असे एकूण 4 लाख 72 हजार  रुपयांचे  मदतीचे धनादेश पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार रवींद्र पाटील, डी.बी.पाटील, जि.प.सदस्य प्रभाकर म्हात्रे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार डॉ.अरूणा जाधव, मुख्याधिकारी अर्चना दिवे, वसुधा पाटील, दयानंद भगत, वैकुंठ पाटील, चैताली पाटील, अविनाश म्हात्रे, परशुराम मोकल, अरुण नाईक, नरेश गावंड आदि उपस्थित होते.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक